Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

निवडणूक विजयासाठी एकदिलाने काम करत विरोधकांच्या अकार्यक्षमतेचा पंचनामा करा

निवडणूक विजयासाठी एकदिलाने काम करत विरोधकांच्या अकार्यक्षमतेचा पंचनामा करा



माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांचे आवहान
लातूर ( प्रतिनिधी ) :- केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून लातूर शहरासह जिल्ह्याच्या विकासाला मोठ्या प्रमाणात निधी मिळत असून कामांना गती मिळालेली आहे. मात्र विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधीने आपले कर्तव्य विसरत सरकारवर खापर फोडण्याचे काम केले आहे त्यामुळे विरोधकांच्या अकार्यक्षमतेचा पंचनामा करत आगामी मनपा निवडणूक जिंकण्यासाठी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करत पक्षाचा झेंडा फडकावा असे आवहान जिल्हा निवडणूक प्रभारी तथा माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे.
 आगामी मनपा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी येथील डॉ. भालचंद्र ब्लड बँकेत पक्ष पदाधिकारी व शक्तीकेंद्र प्रमुखांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, निवडणूक प्रमुख अर्चनाताई पाटील चाकूरकर, शहर सरचिटणीस संजय गीर, रागिणी यादव, निखील गायकवाड, प्रविण कस्तुरे आदींची उपस्थिती होती. 
लातूर शहरासह जिल्ह्याचा विकास करत समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पक्ष पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी काम केले असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील केंद्र व राज्य सरकार निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही देऊन माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी विरोधकांच्या अकार्यक्षमतेचा पाढा वाचून दाखवला. विरोधकांकडून विकासाचे किंवा जनतेच्या हिताचे कोणतेच काम झाले नाही याची आठवण करून देत विरोधी असलेल्या लोकप्रतिनिधीना आपल्या कर्तव्याचा विसर पडला असल्याचे सांगितले. मात्र आपली अकार्यक्षमता लपवण्यासाठी त्यांच्याकडून सरकारवर खापर फोडण्याचे काम सुरु असून त्यांनी लोकांमध्ये संभ्रम निर्माण केल्याचे सांगितले. विरोधकांच्या या अकार्यक्षमतेचा पंचनामा करण्यासाठी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आत एकदिलाने काम करत शहरातील विविध ठिकाणी पंचनामा सभा आयोजित करावी असे आवहान आ. निलंगेकर यांनी केले.
निवडणुकीतील विजय मिळवण्यासाठी पक्षाने जी रणनीती आखली आहे त्यानुसार तर काम करायचे आहे. मात्र त्यापुढे जाऊनही नागरिकांची संपर्क साधत त्यांच्याशी सवांद करत आपला पक्ष व सरकारने केलेले काम त्यांच्यापर्यंत पोहचवा असे सांगत आ. निलंगेकर म्हणाले कि कमळ हाच उमेदवार असून पक्ष योग्य कार्यकर्त्याला संधी देईल असे स्पष्ठ केले. त्यामुळे कमळाच्या विजयासाठी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यानी पुढील २ महिने देऊन एकदिलाने व एकजुटीने कामाला लागावे असे आवहान केले.
मराठवाडा संघटना मंत्री संजय कौडगे यांनी मंडल अध्यक्ष व शक्तीकेंद्र प्रमुख यांच्याकडून आढावा घेत निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी मतदार यादीचे वाचन करत त्याचे वर्गीकरण करावे असे सांगितले. त्याचबरोबर मतदानाची टक्केवारी वाढवत ती वाढलेली टक्केवारी आपल्याला कशी मिळेल यासाठी कशा पद्धतीने काम करायचे याबाबत मार्गदर्शन केले. 
आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून बूथ पुनर रचनेचे काम पुर्ण झाले असल्याचे सांगत शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी बूथ मजबूत करून निवडणूक जिंकण्याची पायाभरणी केली असल्याचे सांगितले. या बैठकीतून निवडणूक जिंकण्याचे तंत्र व मंत्र प्रत्येकाला मिळाला असल्याचे सांगून निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील प्रत्येक उंबरठ्यापर्यंत पोहचावे अशी अपेक्षा व्यक्त केली. या बैठकीतून प्रत्येकाने विजयाचा संकल्प करत आगामी काळात पक्षाच्या विजयाचे ध्येय समोर ठेऊन कामाला लागावे असे आवहान शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी केले. 
निवडणूक जाहीर नसली तरी त्याची प्रक्रिया सुरु झाली असल्याचे सांगत शहर निवडणूक प्रमुख अर्चना पाटील चाकूरकर यांनी पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी असल्याचे सांगितले. इच्छुकांची वाढती संख्या म्हणजे पक्ष आणि पक्ष नेतृत्वावर विश्वास असल्याचे स्पष्ठ होत असून संख्या मोठी असली तरी पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याच्याच विजयासाठी आपण सर्वांनी मिळून कामाला लागावे असे आवहान अर्चना पाटील चाकूरकर यांनी केले.
या बैठकीची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमा पुजनाने तर सांगता राष्ट्रगीताने झाली. बैठकीचे सुत्रसंचलन जिल्हा सरचिटणीस प्रविण कस्तुरे तर आभार प्रदर्शन निखील गायकवाड यांनी केले . या बैठकीस मंडल अध्यक्ष, शक्तीकेंद्र प्रमुख यांच्यासह पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post