जिल्हाधिकारी मॅडम... विशाखा समिती झोपा काढते का?
शिक्षण विभागातील लिंग पिसाट अधिकारी महिलांवर ठेवतात वाईट नजर!
लातूर:
शिक्षण विभागाने दलालांच्या मदतीने सर्वसामान्यांना ओरबडून हाणलं तर या अधिकार्याने खिचडी सेविकेला ही सोडले नसल्याच्या चर्चेने एकचं खळबळ...उडाली आहे, या चर्चेने आता जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात महिलां असुरक्षित असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
लातूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात सध्या या लिंग पिसाट अधिकार्याने कळस गाठला आहे. हा अधिकारी शुक्रवारी दुपारी गायब होतो आणि थेट मंगळवारी दुपारी दर्शन देतो! शासनाचे नियम धाब्यावर बसवत त्यांनी साडेतीन दिवसांचा ‘शासकीय आठवडा’ स्वतःहून लागू केल्याने ते नेमके कोठे आणि कोणांसोबत असतात हे सध्या दिसून येत आहे.
माझे काय वाकडे होणार माझी तर आता 'मे 'मध्ये बदली होणार अशी भावना असलेला या लिंग पिसाट अधिकार्याने लातूरच्या शिक्षण क्षेत्राला बदनाम केले आहे.लातूर हे शिक्षणाची पंढरी समजून सर्वसामान्य महिलां आपल्या मुलांबाळांच्या शिक्षणासाठी बदली करुन येतात आणि हे अशी गिधाडं त्यांच्यावर वाईट नजर ठेवतात.
जिल्हाधिकारी मॅडम... विशाखा समिती झोपा काढते का? आपल्याचं शासकीय कार्यालयात महिला असुरक्षित आहेत...याकडे आपण पाहणार आहेत की नाही?वेळीचं आपण आपल्या शिक्षण उपसंचालक,शिक्षण माध्यमिक, प्राथमिक आशा सर्व शासकीय कार्यालयात विशाखा समिती मार्फत तपासणी करुन अहवाल तयार करणे अपेक्षीत आहे.यातून दोषी अढळणार्या लिंग पिसाट अधिकारी कर्मचार्यांना अशा जागी पाठवा की त्या ठिकाणी महिला तर सोडाचं जनावर सुध्दा दिसणार नाहित...नाहितर हे त्यांच्यावर सुध्दा आत्याचार करतील .
हा अधिकारी भ्रष्टाचारातून कमवलेल्या पैशातून तो लाचार आणि गरजू महिलांचा फायदा घेतो.यासाठी त्याने दलालांची सुध्दा नेमणूक केली आहे.
याने तर चक्क एका ठिकाणी खासगी शाळा बनवून तिथून शिक्षण विभागाचा कारभार चालवतो , नागरिकांच्या कामांना थांबवून, दलालांमार्फत फायलींवर ‘मान्यता’ देण आणिं महिलांवर वाईट नजर ठेवणे हेच त्यांचं मुख्य काम बनले आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी मॅडम आपण अशा या गंभीर गोष्टी कडे वेळीच लक्ष देणे अवश्यक बनले असून अशा लोकांवर कडक कार्यवाही करावी एवढी माफक अपेक्षा व्यक्त होत आहे.
Tags:
LATUR