Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

प्रभाग १८ मधील प्रकार काँग्रेस उमेदवाराकडून भाजपा कार्यकर्त्यांना मारहाण; जिवे मारण्याची धमकी

प्रभाग १८ मधील प्रकार
काँग्रेस उमेदवाराकडून भाजपा कार्यकर्त्यांना  मारहाण; जिवे मारण्याची धमकी

गुंडगिरीला मतदार धडा शिकवतील : सौ. अदिती पाटील कव्हेकर


लातूर दि. १० (प्रतिनिधी) : शहरातील प्रभाग क्रमांक १८ चे काँग्रेस उमेदवार सुंदर पाटील कव्हेकर यांनी भाजपा शहर सरचिटणीस संजय गीर व राजकुमार शेटे या पदाधिकाºयांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली असून पराभव समोर दिसत असल्याने काँग्रेस आता मारहाण व गुंडगिरीवर उतरली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा उमेदवार सौ. अदिती पाटील कव्हेकर यांनी दिली आहे.

यासंदर्भात संजय गीर व राजकुमार शेटे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार माहिती अशी की, भाजपा उमेदवार सौ. अदिती पाटील कव्हेकर, ऋषी राजे, सत्यवती चेवले यांच्या प्रचारार्थ मजगेनगर येथे रॅली सुरु होती. त्या रॅलीत जात असताना काँग्रेसचे उमेदवार सुंदर पाटील व त्यांच्या समर्थकांनी माझ्या हातातील बॅग ओढून घेतली. बॅगमध्ये पैसे आहेत का असे विचारत धक्का-बुक्की केली. बॅगमधील कागदपत्रे दाखवली तरी लाथा बुक्यांनी मारहाण केली. शर्टचा खिसा फाडला. यानंतर प्रचार केलास तर तुला खलास करेन, अशी धमकी दिल्याचे संजय गीर यांनी तक्रारीत म्हटले आहेत. याप्रकरणी संजय गीर यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १७१, १७४, ११५ (२), ३५१ (२), ३५१ (३) नुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे.
राजकुमार शेटे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, सकाळी मी रॅलीत सामील होण्यासाठी स्वत:च्या घराबाहेर गेटजवळ थांबलो होतो त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार सुंदर पाटील व त्यांचे कार्यकर्ते तेथे आले. सुंदर पाटील यांनी मला धक्काबुक्की केली. तु माझा प्रचार केलास तर तुला २५ हजार रुपये देतो असे प्रलोभन दिले. मी प्रचार करण्यास नकार दिला असता त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली. १५तारखेनंतर तुझे कुटूंब जिवंत दिसणार नाही, अशी धमकी दिली. सुंदर पाटील यांच्यापासून माझ्या जिवीतास धोका आहे असे शेटे यांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १७१, १७४, १७०, १७३, ११५ (२), ३५१ (२), ३५१ (३) यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपा उमेदवार सौ. अदिती पाटील कव्हेकर म्हणाल्या की, प्रभाग क्रमांक १८ मध्ये जनता भाजपाच्या पाठीशी आहे.जनता जनार्धन भाजपाचे सर्व उमेदवार विजयी करणार आहे. प्रभागातील वातावरणावरून ही बाब स्पष्ट होत असल्याने काँगे्रस उमेदवार भयभीत झाले आहेत. त्यामुळे असे प्रकार घडत आहेत. मतदार १५ तारखेला भाजपाला विजयी करून कॉग्रेसला धडा शिकवतील, असेही त्या म्हणाल्या.




Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post