Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

शिक्षण उपसंचालक कार्यालयात महिला असुरक्षित!

शिक्षण उपसंचालक कार्यालयात महिला असुरक्षित!



लातूर: लातूर म्हटले तर शिक्षण आणि शिक्षण म्हटले तर लातूर असे एक ब्रीद वाक्य तयार झाले आहे आश्या शिक्षणाच्या माहेर घरात आता महिला शासकीय कार्यालयात असुरक्षित असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले असून गुरुवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयात  एक महिला कर्मचारी आपल्या वरिष्ठाची तक्रार घेवून गणपत मोरे यांच्या दालनात धडकली आणि कार्यालयामध्ये एकचं खळबळ उडाली.तेथील वरिष्ठांकडून या महिलेला कामासंदर्भात नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे आता समोर आले आहे.याबाबत शिक्षण उपसंचालक गणपत मोरे यांनी महिलेची समजूत काढून पाठवले खरे परंतू असे वरिष्ठांकडून महिलेला त्रास होणे हे घातक असल्याचे कार्यालयामध्ये एकचं चर्चा सुरु होती.विशेष म्हणजे लातूरच्या जिल्हाधिकारी या महिला असल्याने ते अशा प्रकरणांमध्ये अतिशय संवेदनशील आहेत.या प्रकरणात मा जिल्हाधिकारी यांनी वेळीच लक्ष घालून विशाखा समितीला प्राचारण करुन कार्यवाही करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांचे संरक्षण करण्यासाठी विशाखा समिती स्थापन केली जाते. 
या समितीची रचना खालीलप्रमाणे आहे: 
विशाखा समितीची स्थापना काम देणाऱ्याला बंधनकारक आहे.
जेथे १० किंवा त्यापेक्षा अधिक जण काम करतात अशा ठिकाणी विशाखा समिती असणे बंधनकारक आहे.
या समितीची बैठक ३ महिन्यातून एकदा घेणे बंधनकारक आहे.
महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वाटावे, कुठल्याही प्रकारचा लैंगिक छळ होऊ नये यासाठी कमिटी काम  करते.
विशाखा समितीची स्थापना कशी झाली?
१९९४ मध्ये महिला तक्रार समितीची स्थापना करण्यात आली होती. 
२०२३ मध्ये तिला विशाखा समिती असे नाव देण्यात आले. 
१९९७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ रोखण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांना विशाखा निकाल म्हटले होते. 
या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून विशाखा समिती असे नाव देण्यात आले. 
विशाखा मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत? 
ही मार्गदर्शक तत्वे कामाच्या ठिकाणी महिलांचे संरक्षण करण्यासाठी बनवण्यात आलेली आहेत.
ही प्रक्रियात्मक स्वरूपाची आहेत आणि महिलांच्या लैंगिक छळाशी संबंधित प्रकरणे हाताळताना कोणत्या पद्धतीचा अवलंब करावा हे सांगतात.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post