प्रभाग १७ मध्ये बंजारा समाज नाराज;मुलासाठी टिकिट नाकारल्याने पक्षावर नाराज..!
लातूर -
भारतीय जनता पार्टी चा एकनिष्ठ आणि संभाजी पाटील निलंगेकर यांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून १९९० पासून काम करत आहेत आणि कारसेवक म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे असे सुरेश राठोड हे सध्या प्रचंड नाराज असल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर सांगीतले आहे.विशेष म्हणजे सुरेश राठोड हे बंजारा समाजाचे असून मागील२५ वर्षा पासून ते भारतीय जनता पार्टी आणि संभाजी पाटील निलंगेकर यांचे निकटवर्ती म्हणून काम करत आहेत परंतू आज त्यांच्याच मुलाला टिकिट नाकारल्याने ते आज नाराज असून या पुढे संपूर्ण बंजारा समाज नाराज असल्याने पक्षाच्या विरोधात जाणार असल्याचे सांगीतले जात आहे .टिकिट वाटपामध्ये काम,एकनिष्ठा न पाहता पैश्याच्या जोरावर टिकीट वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोप समाजातून करण्यात येत आहे.ज्या उमेदवारांना पक्षाने टिकिट वाटप केले त्यांचे नेमके कार्य काय?असाही संतप्त सवाल करण्यात येत आहे.या बंजारासमाजाच्या नाराजीचा फटका प्रभागातील उमेदवाराला नक्कीच बसणार असून यावर संभाजी पाटील निलंगेकर हे आता कशी समजूत काढतात ते पहावे लागेल.
मुलासाठी टिकिट नाकारल्याने पक्षावर नाराज..!
महानगरपालिका निवडणुकीसाठी एकाही बंजारा समाजाच्या उमेदवाराला संधी देण्यात आलेली नाही. या अन्यायाचा संपूर्ण बंजारा समाजाच्या वतीने आम्ही तीव्र जाहीर निषेध व्यक्त करत आहोतइथल्या स्थानिक नेत्यांनी आजवर केवळ मतांच्या राजकारणासाठी बंजारा समाजाचा वापर करून घेतला ज्या समाजाची शहरात मोठी ताकद आहे, त्याच समाजाला उमेदवारी देताना सातत्याने डावलले जात आहे.
सत्तेच्या वाटाघाटीत बंजारा समाजाला गृहीत धरून नेत्यांनी समाजाच्या स्वाभिमानाला धक्का लावला आहे.निवडणूक आली की समाजाची आठवण काढायची आणि संधी देण्याची वेळ आली की दुर्लक्ष करायचे, हा प्रकार आता खपवून घेतला जाणार नाही."येणाऱ्या निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही
समस्त बंजारा समाज, लातूर शहर
Tags:
LATUR
