लातूर च्या शिकवणी क्लासेस मध्ये सलग तिन वर्ष एकाचं विद्यार्थ्यांची जाहिरात तरि 'समाधान'नाही
लातूर -इयत्ता ११ वी, १२ वी, रिपीटर, टेस्ट सिरिज, क्रॅश कोर्स सह इत्यादी कोर्सेस नीट ( राष्ट्रीय पात्रता पूर्व परीक्षा ) च्या तयारीसाठी विविध क्लासेस मध्य हजारोे विद्यार्थी प्रवेश घेतात.परंतू २०२२ मध्ये नीट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर सर्वाधिक मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे फोटो अनेक क्लासेसच्या जाहिरातीत मध्ये झळकत असल्याबद्दल वाद निर्माण झाला होता विविध संघटनांनी यावर आवाज उठवून निवेदनही देण्यात आली त्यानंतर हा प्रकार कमी झाला परंतू आता एका क्लासवाल्याने तर हद्दचं पार केली असून २०२३ पासून ते २०२५ म्हणजे सलग तिन वर्ष एकाच विद्यार्थ्याचा फोटो लावून जाहिरात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.विशेष म्हणजे त्या विद्यार्थ्याला २०२३ निट परिक्षेत ६१३,२०२४ निट परिक्षेत ७०५आणि २०२५ निट परिक्षेत ६३५ मार्क पडल्याचे दिसत आहे याचा अर्थ तो एवढे मार्क घेवून आजून त्याच क्लासेस मध्ये शिकत आहे का..?आजून त्याचा नं कोणत्याही काॅलेज ला लागला नाही का..? का तो एवढे मार्क पडूनही आजून तो 'समाधान'नाही का?असे प्रश्न आता समोर उपस्थित होते आहेत.आता या मध्ये काय गौडबंगाल आहे ते वेळेनुसार समोर येईलचं परंतू आता विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुध्दा सतर्क होण्याची गरज आहे आपल्या मुलाचा फोटो नेमक्या कोणत्या कारणासाठी वापरतात याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे.हे क्लासेस चालवणारे स्त:च्या फायद्यासाठी कोणताही थराला जाण्यासाठी तयार असतात असे हुशार विद्यार्थी आमच्या क्लासेस मध्ये सांगून पालकांची व विद्यार्थ्यांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक करतात. परंतु यामुळे विद्यार्थ्यांला मात्र नुकसानीला सामोरे जावे लागते .आता आश्या गंभीर विषयाकडे पालक काय भुमिका घेतील ते समोर येईलचं परंतू सामाजिक संघटनांनी यावर गंभीर विचार करण्याची गरज भासत आहे.

