Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

ग्रामपंचायत निवडणुकीत हार झाल्याने मा सरपंचाने केला गावच्या पाण्याचा पाणी पुरवठा बंद

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!

ग्रामपंचायत निवडणुकीत हार झाल्याने मा सरपंचाने केला गावच्या पाण्याचा पाणी पुरवठा बंद
दानपत्र 195गट नंबरचे  आणी विहीर मात्र 190 गट नंबर मध्ये 


*भिम आर्मीने निवेदन देताच* *मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी* *ग्रामसेवकावर कायदेशीर कार्यवाहीचे* *दिले आदेश*

लातूर :-

 गेल्या महिन्यात महाराष्ट्रात ग्रामपंचायत मतदान प्रक्रिया पार पडली, याच काळात गावातील नेते मंडळींनी गावकर्यांना मोठ मोठी आश्वासन दिले ते पूर्ण होतील का नाही तो भविष्यातील विषय आहे पण एका माझी सरपंच महाशय यांनी तर पूर्ण केलेल्या कामातच अडथळा आणला आहे
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील हरवाडी या गावात पाण्याची अडचण होत होती म्हणून पूर्वीच्या सरपंचांने स्वतःच्या मालकी हक्काची जमीन गट नंबर 195 मधील काही जमीन ग्रामपंचायत ला दानपत्र करुन दिली आणि शासकीय योजनेतून त्या जागेवर 80लाख रु.ची विहीर खोदून घेतली वर्षभर लोक त्या विहिरीचे पाणी पित होते, परंतू गेल्यामहिन्यात झालेल्या इलेक्शन मध्ये ह्या सरपंचांला हार सहन करावी लागली म्हणून ह्या महाशय यांनी चक्क गावचे पाणीच बंद केले माझ्या विहिरीचे पाणी कोणीही वापरू नये मला ग्रामपंचायत ने महिना ठराविक रक्कम द्यावी म्हणून गावचे पाणी बंद केले आणि एवढेच नव्हे तर ह्या महाशय यांनी यांच्या मालकी हक्काच्या गट नंबर 195 मधील जमीनविहीर पाडण्यासाठी दानपत्र म्हणून दिलेली होती आणी विहीर मात्र त्यांच्याच मालकी हकाच्या गट नंबर 190 मध्ये विहीर पाडलेली आहे म्हणजे दानपत्र 195गट नंबरचे करुन दिले आणी विहीर मात्र 190 गट नंबर मध्ये पाडली हा प्रकार ग्रामस्थ लोकांच्या लक्षात आली या सर्व प्रकारात ग्रामसेवक आणी पंचायत समितीचे अधिकारी सहभागी आहेत या सर्वांवर कायदेशीर कार्यवाही व्हावी आणी गावातील पाणी पुरवठा हा सुरळीत व्हावा म्हणून गेल्या तीन दिवसापासून गावातील 8 व्यक्ती लातूर जिल्हापरिषद येथे आमरण उपोषण करत आहेत, तरी अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याने यांची भेट घेतलेली नाही
हि बाब भिम आर्मी लातूरच्या पदाधीकारी यांना समजताच भिम आर्मी टीमने उपोषण कर्त्यांची भेट घेतली त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणी पंचायत समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली आणि ह्या प्रकरणात दोषी असलेल्या अधिकाऱ्यासह माजी सारपंचावर कार्यवाही करून फसवणूकीचा गुन्हा नोंद करावा गावातील पाणी पुरवठा सुरळीत करावा असे निवेदन भिम आर्मीच्या वतीने देण्यात आले, सध्या थंडीचे दिवस आहेत थंडीही जास्त सुटलेली आहे तेव्हा उपोषणकरत्याचा विचार करुन त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या अशी मागणी करण्यात आली, भिम आर्मीच्या पत्राने संबंधित ग्रामसेवकावर कायदेशीर कार्यवाहीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले यावेळी भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षय धावारे मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे लातूर जिल्हा प्रमुख विलास आण्णा चक्रे जिल्हा महासचिव बब्बी कांबळे शहर अध्यक्ष बापू शेळके अजय शेळके किरण इंगळेसह मोठ्या संख्येने भीम आर्मीचे पदाधीकारी उपस्थित होते

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post