अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल होण्यापासून वाचवण्याचा मुंद्रांक विभाग आणि पोलिस प्रयत्न करत आहेत का ?– एकच दस्त ९०१८/२२५ नोंदणीत वापरलेला असताना आणि– विशेष म्हणजे जिल्हा इंडस्ट्री बोर्डाच्या मुद्रांक माफीच्या ठरावावर पार्थ पवारांची सही आहे हे चौकशी अहवालात नमूद असूनही पार्थ पवारांच नाव घेणं यंत्रणांनी का टाळलं ?.
मुद्रांक शुल्क भरले फक्त ५०० रुपये: अमेडिया कंपनीचा पत्ता पार्थ पवारांच्या घराचा; शासनाची १५२ कोटींची फसवणूक; समिती करणार चौकशी; सह दुय्यम निबंधकावर निलंबनाची कारवाई; अजित पवार यांच्या राजीनाम्याची विरोधकांची मागणी
पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून १,८०० कोटींचे बाजारमूल्य असणारी जमीन केवळ ३०० कोटींमध्ये खरेदी करण्यात आली. या खरेदी व्यवहारात शासनाची १५२ कोटींची फसवणूक फसवणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खरेदी व्यवहारात केवळ ५०० रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे. यात सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांना निलंबित करण्यात आले आहे. यावरून राजकीय राळ उठली असून, अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्ष करत आहेत.
मुंढवा येथील जमीन प्रकरणात मालमता पत्रकावर राज्य सरकारची मालकी असताना खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यात आला. जमीन विक्रीची परवानगी घेण्यापूर्वी जमीन मूल्याच्या ५० टक्के नजराणा भरणे अपेक्षित असताना संबंधित कंपनीने तो न भरताच सातबारा उताऱ्याच्या आधारे व्यवहार पूर्ण केला. यातून १४६ कोटी रुपयांची, तसेच व्यवहार करताना दोन टक्के मुद्रांक शुल्काची सहा कोटी रुपयांची रक्कम भरली नाही. त्यामुळे राज्य सरकारची १५२ कोटी रुपयांची फसवणूक झाली.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने अमेडिया एंटरप्राईजेस एलएलपी कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. या कंपनीचा पत्ता पार्थ पवार यांचा रहिवासी बंगला (पान २ वर)
संपूर्ण व्यवहार दिग्विजय पाटीलच्या नावाने; पार्थ यांनी दिले होते अधिकार
मुंढवा येथील जमीन प्रकरणाचा संपूर्ण खरेदी-विक्रीचा व्यवहार दिग्विजय पाटील यांच्या नावाने झाला असून पार्थ पवार यांचे ते नातेवाईक आणि भागीदार आहेत. एप्रिलमध्ये झालेल्या करारानुसार कंपनीचे भागीदार या नात्याने या जमिनीचा व्यवहार करावा आणि योग्य त्या ठिकाणी कागदपत्रांवर सह्या कराव्यात, असे पार्थ पवार यांनी त्यात स्पष्ट केले आहे.
जमीन खरेदीची सखोल चौकशी करणार: मुख्यमंत्री
नागपूर : पार्थ पवार यांच्यावर जमीन जमीन घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणासंदर्भात सर्व माहिती मागविली असून योग्य चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीच्या आधारावर यासंदर्भात पावले उचलू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
प्राथमिकदृष्ट्या जे मुद्दे समोर 3 आले आहेत ते गंभीर आहेत. त्याबाबत पूर्ण माहिती घेऊनच बोलेन. उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील कुठल्याही प्रकाराला पाठीशी घालणार नाहीत. कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे ही आमची भूमिका आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी चौकशीसाठी समिती
मुंबई: पुण्यातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणावर मुद्रांक शुल्क चुकविल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक सुहास दिवसे यांच्यामार्फत सह नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक अधीक्षक (मुख्यालय), पुणे राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. सात दिवसांत ही समिती अहवाल सादर करेल.
सह दुय्यम निबंधकासह तिघांवर गुन्हा दाखल
जमीन व्यवहार प्रकरणी संतोष हिंगणे (सह जिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जमीन विक्रीबाबत कुलमुखत्यारपत्र असलेली शीतल किशनचंद तेजवानी, अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील आणि सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला
Tags:
PUNE

