Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

औसा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी भ्रष्टाचाराने बरबटलेले;वादाच्या जमिन,प्लाॅट चे दस्त करण्यात उस्ताद

औसा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी भ्रष्टाचाराने बरबटलेले
वादाच्या जमिन,प्लाॅट चे दस्त करण्यात उस्ताद

बनावट ८-अ जोडून प्लॉटची परस्पर विक्री; दोघांवर गुन्हा दाखल


औसा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी भ्रष्टाचाराने बरबटलेले असल्याचे आता चित्र या अशा प्रकरणावरुन स्पष्ट होत आहे.वादाच्या जमिन,वादातील प्लाॅट चे दस्त करण्यात हे अधिकारी उस्ताद असल्याचे दिसत आहे.चुकिचे आणि बनावट कागदपत्रे तयार करणार्यावर कठोर कार्यवाही व्हावीचं परंतू त्याबरोबर त्यास जबाबदार असलेल्या भ्रष्टाचारी अधिकारी यांच्यावरही कार्यवाही करावी परंतू तसे होताना दिसत नाही उलट
अशा अधिकार्याची वाट देवा सारखी पाहिली जाते ते याचं कारणांसाठी .काही विपरित झाले तर गुन्हा दाखल करुन हे अधिकारी आपल्या अंगावरचे घोंगडे दुसर्यावर टाकुन मोकळे होतात परंतू कागदपत्रे तपासण्याची दस्ती हे घेत नाहित किंबहूना त्यांना पैशासमोर वेळ नसतो.
काहि वर्षा पुर्वी याच अधिकार्यावर लाच लुचपत विभागाने धाड टाकून पकडले होते.तरि पण हा अधिकारी सुधरत नाही उलट त्याला असे कामे करण्यासाठी औसा पाठोपाठ लातूर ही दिले असल्याने यावर वरिष्ठांची मेहर नजर आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.त्यामुळे अश्या अधिकार्यांची सर्वसामान्य नागरिकांना लुबाडण्याचे काम चालू आहे.यातून 'विशाल'माया जमा केल्याचे बोलले जात आहे. प्रथमथ:अश्या अधिकार्याला पदभारचं दिला कसा हेचं विचार करण्यासारखे आहे.त्यामुळे असले अधिकारी पैशाच्या लालसे पोटी कागदपत्रा ची तपासणी,पडताळणी करत नाहीत आणि त्याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे.अश्या बरबटलेल्या अधिकार्याची त्याच्या कार्यकाळातील सर्व दस्तावेज तपासावेत अशी मागणी होत आहे

लातूर : महानगरपालिकेचा बनावट ८-अ बदलून त्याच्या आधारावर तिसऱ्यालाच प्लॉटची विक्री करणाऱ्या दोघांविरोधात लातूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशी केल्यानंतर सदर प्लॉटची विक्री ५ ऑगस्ट २०२४ रोजी झाली होती. चौकशीत सिध्द झाल्यानंतर गुरुवारी (दि.१५) दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औसा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात कार्यरत असलेले श्रीनिवास महादेव जगदाळे हे ५ ऑगस्ट २०२४ या दिवशी वरिष्ठांच्या आदेशावरून लातूर येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात कर्तव्यावर आले होते. त्याच दिवशी महानगरपालिकेचा बनावट ८-अ जोडून आरोपी सय्यद मसूद मुसा कादरी (रा. खतीब कॉलनी, बिदर रोड, उदगीर) व रुकसाना वसीम शेख (रा. तेली गल्ली, औसा) यांनी एका प्लॉटचा व्यवहार केला. ८-अ वर क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा सही-शिक्का असल्याने सहदुय्यम निबंधक कार्यालयाने खरेदी व्यवहारास परवानगी दिली. परंतु, लक्ष्मीछाया औसेकर यांनी सदर प्लॉट खरेदी करण्यासाठी मूळ मालकाकडे आर्थिक व्यवहार केला होता. औसेकर यांनी पैसे बुडण्याच्या भीतीने सदर बोगस ८-अ ची चौकशी करण्याची मागणी केली. त्यावरून सह दुय्यम निबंधक कार्यालयाने लातूर महापालिकेकडे सदर प्लॉटची माहिती मागविली. त्यावेळी सदर प्लॉट तिसऱ्याच्याच नावे असल्याचे स्पष्ट झाले. आरोपी सय्यद मसूद मुसा कादरी व रुकसाना वसीम शेख यांनी बनावट ८-अ तयार करून शासनाची व इतरांची आर्थिक फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. त्यावरून आरोपी सय्यद मसूद मुसा कादरी व रुकसाना शेख यांच्याविरोधात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुरनं. १७६/२५ कलम ३१८ (४),३३६ (३),३४०(२),३ (५), ८२, ८३ भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शिवाजी नगर पोलीस करीत आहेत.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post