ट्वेंटीवन शुगर्स कारखान्याचे विधीवत पूजनाने बॉयलर अग्नि प्रदीपन केले
शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रतिटन ३१५१ रुपये भाव देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी जिद्दीने प्रयत्न करावे -सौ अदिती देशमुख
लातूर नजीकच्या मळवटी येथील ट्वेंटीवन शुगर्स येथे सौ. अदिती देशमुख, चि. अवीर तसेच सहकाऱ्यांसह उपस्थित राहून कारखान्याचे विधीवत पूजनाने बॉयलरअग्नि प्रदीपन केले. या निमित्ताने उपस्थित सहकारी, शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, कामगार, मजूर यांच्याशी संवाद साधला. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
अत्यंत अद्यावत यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या ट्वेंटीवन शुगर्स ने आता ऊस तोडणीतही यांत्रिकीकरण आणले आहे, यातून शेतकऱ्यांच्या मुलांसाठी रोजगारही उपलब्ध झाला आहे. कमीत कमी खर्चात अधिकाधिक उत्पादन घेऊन शेतकऱ्यांच्या कष्टाला अधिकचा मोबदला मिळावा असा प्रयत्न सुरू आहे.
मागच्या गळीत हंगामातील गाळप ऊसाला ट्वेंटीवन शुगर्सने प्रतिटन ३००१ रुपये एवढा विक्रमी भाव दिला आहे. लवकरच सुरुवात होत असलेल्या आगामी गळीत हंगामात मांजरा परिवाराने जाहीर केलेल्या संकल्पानुसार शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रतिटन ३१५१ रुपये भाव देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण सर्वांना जिद्दीने प्रयत्न करण्याचे ट्वेंटीवन शुगर्सच्या संचालिका सौ अदिती देशमुख यांनी यावेळी सांगीतले यातून परिसरातील शेतकरी, शेतमजूर कामगार या सर्वांच्या जीवनात समृद्धी, स्थैर्य आणि आनंद निर्माण होईल हा विश्वास व्यक्त करण्यात आला
Tags:
LATUR
.jpg)





