दिवाळी संध्या संगीत मैफल
प्रख्यात गायक राहुल देशपांडे देणार शास्त्रीय संगीताची मेजवानी, दिवाळी संध्या संगीत मैफल
विलास को.ऑपरेटीव्ह बँकेच्या वतीने आयोजन
लातूर/ प्रतिनिधी-
दिवाळीच्या उत्साहात स्वरांची अनुभूती मिळवण्यासाठी आमदार अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विलास को.ऑपरेटीव्ह बँकेच्या वतीने दिवाळी संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.प्रख्यात भारतीय शास्त्रीय संगीत गायक राहुल देशपांडे आपल्या सुरेलआवाजाने कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहेत.हि दिवाळी संध्या कार्यक्रम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क (टाऊनहॉल), लातूर येथे बुधवार, २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजता हा रंगणारआहे. या मैफलीत नाट्यसंगीत, भावगीत, अभंग, सारख्या
शास्त्रीय बंदिशींचा सुरेल अनुभव लातूरकरांना घेता येणार आहे. हासंगीतसोहळा, पारंपरिक शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून दिवाळीच्याआनंदाला सुरेल स्पर्श देणार आहे.
पारंपरिक भारतीय शास्त्रीय संगीताचे स्वर लातूरकरांसाठी एक अविस्मरणीयअनुभव देणार आहेत. विलास सहकारी बँकेच्या वतीने लातूरकरांसाठी दिवाळीसंध्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही एक खास संगीत पर्वणी असणार आहे. या कार्य़क्रमाचा सर्व लातूरकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन लातूर शहर कांग्रेस जिल्हाध्यक्ष तथा विलास को.ऑपरेटीव्ह बँकेचे संचालक अॅड किरण जाधव यांनी केले आहे
#newstoday #newstoday #latur #latur #लातूर #amitdeshmukh #congressparty #bjp #bjp4ind #devendrafadnavis
Tags:
LATUR
