Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लाखों रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू वाहनासह जप्त. दोन व्यक्ती विरुद्ध गुन्हे दाखल.


लाखों रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू वाहनासह जप्त. दोन व्यक्ती विरुद्ध गुन्हे दाखल
स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यावर कारवाई

         

    
                या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात अवैध धंद्यावर कठोर कारवाई साठी मोहीम जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. 
                 त्या अनुषंगाने अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना दिनांक 18 ऑक्टोंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, काही इसम महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय,साठवणूकसाठी वाहतूक करीत आहेत.
                   सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण व वाढवणा हद्दीत सापळा लावून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखूची अवैध विक्री व्यवसाय, साठवणूक करण्यासाठी वाहतूक करणाऱ्यावर 02 गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन्ही गुन्ह्यात 04 लाख 18 हजार 796 रुपयांच्या प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच गुन्ह्यामध्ये वापरलेली 05 लाख 20 हजार रुपयाची दोन वाहन असा एकूण 09 लाख 38 हजार 794 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
               प्रतिबंधित गुटख्याची अवैधरित्या विक्री, वाहतूक, साठवणूक करताना मिळून आलेले इसम नामे

1) अमजद निजामुद्दीन बिद्रे, 37 वर्ष , राहणार कुमठा, तालुका अहमदपूर. 

2) परमेश्वर काशिनाथ वसमते वय 36 वर्ष, राहणार आवलकोंडा, तालुका उदगीर.

              याचे विरुद्ध अनुक्रमे पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण, वाढवणा येथे दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
               सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील दोन पथकातील पोलीस अंमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर,अर्जुन रजपूत, मनोज खोसे, संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, पाराजी पुठ्ठेवाड, तुळशीराम बुरुरे यांनी केली आहे.
            लातूर स्थानिक गुन्हे शाखेने अलीकडच्या काळात गुटख्यावर अनेक यशस्वी कारवाया केल्या आहेत. या कारवाया पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या मोहिमेचा भाग असून स्थानिक गुन्हे शाखा प्रतिबंधित गुटख्याची विक्री आणि वाहतूक थांबवण्यासाठी सतत सक्रिय आहे.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post