माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी
सर्वात जास्त मार्केट टॅक्स भरण्यात सतत तेरा वर्षापासून प्रथम क्रमांक, कीर्ति ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अशोक भुतडा यांचा माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दीपावलीनिमित्त कार्यक्रमास उपस्थित राहून दिल्या शुभेच्छा
सर्वात जास्त मार्केट टॅक्स भरण्यात सतत तेरा वर्षापासून प्रथम क्रमांक, कीर्ति ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अशोक भुतडा यांचा माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
लातूर प्रतिनिधी, शुक्रवार, २४ ऑक्टोबर २०२५:
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित दीपावलीनिमित्त अल्पोपहार (फराळ) कार्यक्रमास उपस्थित राहून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
शुक्रवार दि. २४ ऑक्टोबर रोजी दुपारी माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते बाजार समितीच्या वतीने अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. तसेच, जास्तीत जास्त टॅक्स भरलेल्या व्यापाऱ्यांचा सत्कारही बाजार समितीच्या वतीने करण्यात आला.
यावेळी बोलताना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने दिवाळी फराळ हा अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. वर्षभर काबाडकष्ट केल्यानंतर सणासुदीला एकत्र यावे, एकमेकांना ऐकावे आणि आपल्यातील स्नेह वृद्धिंगत करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ते पुढे बोलतांना म्हणाले, "लोकनेते विलासराव देशमुख यांच्या विचाराने लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजार चालतो. या वैचारिक शिदोरीमुळेच लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीला देशात व राज्यात उच्च क्रमांक गाठता आला आहे." लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती ऐतिहासिक बाजारपेठ आहे, हिचे अस्तित्व टिकले पाहिजे. कारण शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव देणारी ही बाजारपेठ आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, उपसभापती सुनिल पडिले, कीर्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अशोक भुतडा, हुकूमचंद कलंत्री, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी सभापती ललितभाई शहा, ट्वेंटीवन शुगरचे व्हा. चेअरमन विजय देशमुख, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हा. चेअरमन समद पटेल, प्रभारी सचिव अरविंद पाटील, सहसचिव सतीश भोसले अशोक अग्रवाल, संचालक सर्वश्री बालाप्रसाद बिदादा, श्रीनिवास शेळके,सचिन सूर्यवंशी, सुधीर गोजमगुंडे, युवराज जाधव, आनंद पवार, अनिल पाटील, प्रा. बालाजी वाघमारे, शिवाजी देशमुख, शिवाजी कांबळे, लक्ष्मण पाटील, अभय शहा, आनंद मालू, तुळशीराम गंभीरे आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, आडते, व्यापारी, खरेदीदार, हमाल, मापाडी, गुमास्ता, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
-----------------------------
Tags:
LATUR
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)



