मा. महामहीम राज्यपाल राजस्थान श्री हरिभाऊ बागडेनानां यांची कीर्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अशोक विष्णूदास जी भुतडा यांच्या निवासस्थानास भेट*
लातूर, दि. २५ :'संत भेटती आजी मज!': या अभंगा प्रमाणे संत भेटल्याने ते आपल्याला चतुर्भुज बनवतात आणि त्यांच्या कृपेने आपण परम पदाला पोहोचतो याप्रमाणे दीपावलीच्या या पावन सणात मा. महामहीम राज्यपाल राजस्थान श्री हरिभाऊ बागडे नानांसारख्या आदरणीय संत व्यक्तिमत्वाची भेट लाभणे म्हणजे खरोखरच दुग्धशर्करा योग आहे.मा. महामहीम राज्यपाल राजस्थान श्री हरिभाऊ बागडे नाना यांनी शनिवारी दुपारी किर्ती ग्रुप उद्योग यांच्या निवासस्थानी भेट दिली त्या प्रसंगी सर्वात जास्त मार्केट टॅक्स भरण्यात सतत तेरा वर्षापासून प्रथम क्रमांक मिळवणार्यां कीर्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे अशोक विष्णूदास जी भुतडा, यांनी शाल फेटा व राधा कृष्ण यांची मूर्ती भेट देवून समस्त भुतडा परिवारांकडून सत्कार करण्यात आला.
शिक्षण हेच गरिबी दूर करण्याचे साधन आहे.आपण घेतलेल्या उद्योग व्यवसायाचे शिक्षणामुळे आपला उद्योग व्यवसायाचा आलेख असाच चढता राहावे असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले तसेच सर्व युवा पीढ़ीचे अभिनंदन करून मोलाचे मार्गदर्शन करुन प्रेरणा दिली व अशीच प्रगती पुढे चालत रहावी यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या
यावेळी श्री बी. बी. ठोंबरे साहेब नॅचरल शुगर, श्री हुकूमचंदजी बन्सीलाल जी कलंत्री, अध्यक्ष डाळ मिल असोसिएशन लातूर ,विवेक जी देशपांडे उद्योगपती ,छत्रपती संभाजी नगर, श्री प्रवीण जी सर देशमुख साहेब, सुधीर जी धुतेकरसाहेब, हेमंत जी वैद्य साहेब आदी उपस्थित होते. या प्रसंगी सतीश, अशोक , किर्ती, भारत, CA आनंद, CA अर्जुन, अजित, अंकित CA अरविंद , आदित्य भुतडा व कुटुंबीय होते , या वेळी घरातील सर्व भगिनी, मुले उपस्थित राहिल्या
Tags:
LATUR




