Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

परळीमध्ये संत -महंत व मान्यवरांच्या उपस्थितीत "बाजीराव पेट्रोलियम"पंपाचा होणार शुभारंभ

परळीमध्ये संत -महंत व मान्यवरांच्या उपस्थितीत "बाजीराव पेट्रोलियम"पंपाचा होणार शुभारंभ 




_प.पु. महादेव महाराज चाकरवाडीकर, प.पु. आमृताश्रम स्वामी, प.पु. नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज, ना. पंकजाताई मुंडे, आ. धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती_

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) – 
        परळी शहराच्या सेवा क्षेत्राच्या वैभवात भर घालणारा अत्याधुनिक असा "बाजीराव पेट्रोलियम" या नवीन पेट्रोल पंपाचे येत्या शनिवार, दि. २७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३१ वाजता संत,महंत व मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिली आहे.

    ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिर पासून काही अंतरावरच परळी ते नंदगौळ–पुस-बर्दापूर रोडवर, श्रद्धानंद गुरुकुल आश्रमासमोर उभारण्यात आलेल्या बाजीराव पेट्रोलियम या भारत पेट्रोलियमच्या अत्याधुनिक पंपावर २४ तास इंधन सेवा उपलब्ध राहणार असून ग्राहकांसाठी सर्व आधुनिक सुविधा पुरवण्यात येणार आहेत. या पेट्रोल पंपाचा शुभारंभ राज्याच्या पर्यावरण, हवामान बदल व पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे आणि माजी मंत्री, आमदार धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते होणार आहे. उद्घाटन प्रसंगी शांतिब्रह्म गुरुवर्य ह.भ.प.प. पू.महादेव महाराज चाकरवाडीकर, धर्मगुरू प.पू.अमृताश्रम स्वामी आणि १०८ नंदीकेश्वर शिवाचार्य स्वामी महाराज यांचे आशीर्वाद व आध्यात्मिक सान्निध्य लाभणार आहे. तसेच भारत पेट्रोलियम कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी अहिल्यानगर विभागाचे टेरिटरी मॅनेजर मनोज जगताप, बीडचे वरिष्ठ व्यवस्थापक नीलेश नरखेडे, सहाय्यक व्यवस्थापक अभिषेक कुमार, टेरिटरी को-ऑर्डिनेटर कीर्ती सिंघानी आणि सोलापूरचे वरिष्ठ व्यवस्थापक सचिन रावत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
         या नव्या सेवा व्यवसायाच्या शुभारंभ सोहळ्याला परळी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन"बाजीराव पेट्रोलियम"चे प्रोप्रायटर, माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी , हरिहर धर्माधिकारी, अ‍ॅड. प्रताप धर्माधिकारी आणि परिवाराने केले आहे.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post