संत महंतांच्या मंगलमय उपस्थितीत 'बाजीराव पेट्रोलियमचे' आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन
_भरपावसातही स्नेही, हितचिंतकांच्या शुभेच्छा व प्रेम ओसंडून वाहिले!_
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
परळी शहराच्या सेवा क्षेत्राचे वैभव वाढविणाऱ्या 'बाजीराव पेट्रोलियम' या नावाने परळी नंदागौळ-पुस- बर्दापूर या रस्त्यावर अत्याधुनिक पेट्रोल पंप उभारण्यात आला असुन या पेट्रोल पंपाचे आज माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते व संत महंतांच्या मंगलमय उपस्थितीमध्ये उद्घाटन करण्यात आले. भर पावसातही झालेल्या या शानदार समारंभाला परळीतील मोठ्या संख्येने विविध स्तरातील नागरिक उपस्थित होते.
ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिर पासून काही अंतरावरच परळी ते नंदगौळ–पुस-बर्दापूर रोडवर, श्रद्धानंद गुरुकुल आश्रमासमोर उभारण्यात आलेल्या बाजीराव पेट्रोलियम या भारत पेट्रोलियमच्या अत्याधुनिक पंपावर २४ तास इंधन सेवा उपलब्ध राहणार असून ग्राहकांसाठी सर्व आधुनिक सुविधा पुरवण्यात येणार आहेत. या पेट्रोल पंपाचा शुभारंभ आज माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.उद्घाटन प्रसंगी शांतिब्रह्म गुरुवर्य ह.भ.प.प. पू.महादेव महाराज चाकरवाडीकर, धर्मगुरू प.पू.अमृताश्रम स्वामी आणि १०८ नंदीकेश्वर शिवाचार्य स्वामी महाराज यांचे आशीर्वाद व आध्यात्मिक सान्निध्य लाभले. प्रारंभी आ. धनंजय मुंडे व संत महंतांच्या हस्ते विधिवत पूजा करुन व फीत कापून पेट्रोल पंपाचे उद्घाटन झाले. यावेळी उपस्थित संत महंतांचे पूजन व यथोचित सन्मान धर्माधिकारी परिवाराच्या वतीने करण्यात आला.तसेच आ.धनंजय मुंडे यांचा ह्रदय सत्कार करण्यात आला. उपस्थित संत महंतांनी या नव्या व्यवसायाला आपले आशीर्वाद प्रदान केले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार 'बाजीराव पेट्रोलियम'चे प्रोप्रायटर, माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव (भैय्या) धर्माधिकारी, हरिहर धर्माधिकारी,अॅड. प्रताप धर्माधिकारी यांनी केला.
दरम्यान, गेल्या दोन दिवसापासून परळी व परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. आजही सकाळपासूनच मोठा पाऊस सुरूच होता. मात्र या नव्या सेवा व्यवसायाच्या शुभारंभ सोहळ्याला भरपावसातही परळी व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा देत धर्माधिकारी परिवारील प्रेम व्यक्त केले. त्याचबरोबर संपूर्ण दिवसभर या नव्या व्यवसायाला शुभेच्छा देण्यासाठी सर्व स्तरातील नागरिकांची 'बाजीराव पेट्रोलियम' वर रीघ लागली होती.भर पावसातही स्नेही, हितचिंतकांनी आवर्जून उपस्थित राहून भेट देऊन, सदिच्छा व शुभेच्छा व्यक्त केल्या. एक प्रकारे भर पावसातही परळीकरांचे धर्माधिकारी परिवारावरील प्रेम यानिमित्ताने ओसंडून वाहिल्याचे चित्र बघायला मिळाले.