संत गोरोबा सोसायटीत पहिला नवरात्र महोत्सवास केली सुरुवात.
झांज, हलकी, वादंगाच्या गजरात आई जगदंबेचे उत्साहात आगमन.
लातूर प्रतिनिधी; (दि. 23 सप्टें.)
संत गोरोबा सोसायटी लातूर येथे नागरिकांच्या मागणीतून सर्व नागरिकांची बैठक बोलावून सर्वांशी चर्चा करून एकमताने नवरात्र महोत्सव यावर्षी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने या सोसायटीत पहिला नवरात्र महोत्सव सुरुवात करण्यात आली.
लातूर शहरातील सर्व सोसायटी मधून नावारुपाला आलेल्या संत गोरोबा सोसायटीत यावर्षी सर्वानुमते नवरात्र महोत्सव नऊ दिवसाचा साजरा करण्याचा नागरिकांच्या वतीने निर्णय घेण्यात आल्याने संत गोरोबा सोसायटीने नवरात्र महोत्सव पहिल्यांदा साजरा प्रथम वर्ष 2025 दिनांक 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी संत गोरोबा सोसायटी येथे झांज, हलकी, वादंगाच्या गजरात मोठ्या उत्साहात आई जगदंबा मातेचे आगमन करण्यात आले.
यावेळी आई जगदंबा देवीची पहिली आरती संत गोरोबा सोसायटीचे चेअरमन विकास कांबळे यांनी आपल्या पत्नीसह आरती करून प्रसाद वाटप करण्यात आला.
याप्रसंगी संत गोरोबा सोसायटीचे संचालक देविदास गायकवाड, प्रकाश पाटोळे, श्रीमंत गायकवाड, महादू कांबळे, हरी पवार, अनिकेत कांबळे, राहुल मस्के, रवी मस्के, सुनील समुखराव, अजय सोमवंशी, अजित रणदिवे, विनोद क्षीरसागर, पवन सूर्यवंशी, आकाश पाडुळे, अजय कांबळे, संजू मस्के, खंडू सुरवसे, ......कोमल पाटोळे,महिना भालेकर,शालिनी बनसोडे, प्रियंका देडे,सखुबाई मस्के,सुरेखा देडे, सपना जाचक,अनिता कांबळे,सती भामा गायकवाड,रेश्मा पवार,लक्ष्मी कांबळे, छाया कांबळे,राहीबाई कांबळे,
आदींसह सोसायटीतील इतर अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags:
LATUR