गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळा उद्घाटनाची प्रतिक्षा संपली; मुख्य मंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन,निलंगेकरांनी पाळला शब्द
लातूर:जिल्हापरिषद मागील दोन वर्षापासून उभा टाकलेला लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा पुतळा उद्घाटनासाठी येथे निपचीत वाट पाहत उभा होता याबाबत प्रशासनातील आणि भाजपा मधील नेत्यांना याबाबत विचार करायला वेळ नव्हता यावर नुकत्याचं भाजपामध्ये ग्रामीण जिल्हाध्यपदी निवडून आलेल्या बस्वराज पाटील यांना लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळयाच्या उद्घाटना संदर्भात पत्रकार परिषद मध्ये प्रश्न केला असता वेळ काढूपणा करुन मला याबाबत माहिती नाही माहीती घेवून सांगतो म्हणाले होतेे परंतू पत्रकार परिषद संपल्यानंतर मात्र निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी विषयाची गंभीरता लक्ष्यात घेवून आणि त्यांचे असलेले लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यावरचे प्रेम यामुळे त्यांनी पत्रकारांना शब्द दिला कि लवकरचं मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करणार असल्याचे सांगीतले आणि तो शब्द आज खरा झाला आणि मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीसचं नव्हे तर उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,आणि लातूरच मंत्री ,आमदार,खासदार अश्या दिग्गज नेत्यांच्या हस्ते उद्या सोमवार दि ११ ॴॅगस्ट रोजी सकाळी ११:००च्या सुमारास लोकनेते गोपीनाथराव मुंडे याच्या पुर्णाकृती पुतळयाचे उद्घाटन होणार आहे त्यामुळे
लातूरमधीलच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रातून त्यांचे कौतूक होत आहे.
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लातूर येथे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण*
: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवार, 11 ऑगस्ट 2025 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या लातूर जिल्हा परिषद परिसरात उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे 11 ऑगस्ट रोजी सकाळी 11.20 वाजता लातूर विमानतळावर आगमन होईल. सकाळी 11.45 वाजता ते लातूर जिल्हा शासकीय विश्रामगृह येथे लातूर जिल्हा विकास कामासंदर्भात अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करतील. दुपारी 12.50 वाजता त्यांच्या हस्ते लातूर जिल्हा परिषद येथील लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होईल. दुपारी 1.15 वाजता दयानंद महाविद्यालय मैदान येथे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणानिमित्त आयोजित मुख्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 2.55 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.
****
Tags:
LATUR