प्राचार्य डी. एन. केंद्रे यांचा वाढदिवस
विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा
लातूर : राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाचे सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे यांचा ६९वा वाढदिवस गुरुवारी राजमाता जिजामाता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, एमसीव्हीसी, राजमाता जिजामाता बी.एड. कॉलेज, तुळजाभवानी प्राथमिक, माध्यमिक व इंग्लिश स्कूल आणि संगमेश्वर विद्यामंदिरच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.
यानिमित्त लायन्स नेत्र रुग्णालय, उदगीरच्यावतीने राजमाता जिजामाता विद्यालयात मोफत नेत्र तपासणी शिबिर पार पडले. संत भगवानबाबा बॉईज हॉस्टेलच्यावतीने संचालक गोरख दराडे यांच्या मार्गदर्शनात सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. विजेत्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे ११००, ५०१ व २५१ रुपये पारितोषिक वितरण करण्यात आले. संगमेश्वर विद्यामंदिरच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. तुळजाभवानी विद्यालयाच्यावतीने क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या संघास बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच संकुलातील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, वृक्षारोपण आदी उपक्रम राबविण्यात आले.
प्रारंभी संकुलाच्यावतीने केक कापून प्राचार्य डी. एन. केंद्रे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्ष के. ए. जायेभाये होत्या. यावेळी प्राचार्य संगमेश्वर केंद्रे, उपप्राचार्या कविता केंद्रे, मुख्याध्यापिका स्वाती केंद्रे, समन्वयक अश्विनी केंद्रे, प्रा. वैशाली केंद्रे, करिष्मा केंद्रे, राजेंद्र जायेभाये, प्राचार्य जी. आर. मुंडे, शैक्षणिक समन्वयक राजीव मुंढे, राणी केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन मदन धुमाळ यांनी केले. यावेळी संकुलातील प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
विभागीय शिक्षण मंडळाचे चेअरमन सुधाकर तेलंग, शिक्षण उपसंचालक दत्तात्रय मठपती, सहायक शिक्षण उपसंचालक संजय पंचगल्ले, माजी आमदार वैजनाथ शिंदे, गणपतराव बाजुळगे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मकरंद सावे, जिल्हा कार्याध्यक्ष बबन भोसले, ‘आरसीसी’चे डॉ. धर्मराज जांभळे, लक्ष्मण मोटेगावकर, प्रमोद घुगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त प्राचार्य डी. एन. केंद्रे यांना शुभेच्छा दिल्या.
Tags:
LATUR