लातूर परिचारिकांचे काम बंद आंदोलनाचा चौथा दिवस
सातव्या वेतन आयोगातील वेतनत्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन करत असून लातूर जिल्हातील सर्व आरोग्य सेवेतील परिचारीका यात सामील आहेत. वि.दे शा.वै.म.व रुग्णालय- ३२०, वि.दे अतिविशेष रुग्णालय- ७४,स्त्री रुग्णालय- ४०, उपजिल्हा/ ग्रामीण रुग्णालय-१०८, बाभळगाव नर्सिग काॅलेज-०४, वि.दे शा.प.महाविद्यालय- ०४, एकुण ५५० सभासद संपात आहेत जर राज्य शासनाने यांची दखल न घेतल्यामुळे आज दिनांक १८ जुलैपासून महाराष्ट्र राज्य परिचारिका संघाच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे.
* *खालील प्रमाणे आमच्या मागण्या आहेत*
1. अधिपरिचारिका, परिसेविका, पाठयनिर्देशिका तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील बालरोग परिचारिका या पदाच्या वेतन त्रुटी निवारण करावे.
2. राज्यातील परिचारिकांना केंद्र शासनाप्रमाणे नर्सिग भत्ता ७२०० व गणवेश भत्ता १८०० मंजूर करावा व पात्र परिचातिकंना शैक्षणिक भत्ते मंजूर करावे.
3. पदनाम बदल- केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील परिचारिकांच्या पदनामा मध्ये बदल करण्यात यावा.
4. कंत्राटि पदभरती नियम शासनाच्या परिपत्रकातून वगळण्यात यावे.
5. कायमस्वरूपी १००% पदभरती,पदनिर्मिती,व पदोन्नती करण्यात याव्यात
6. स्वतंत्र संचालनालयाची स्थापना करण्यात यावी.
7. अधिपरिचारिका सेवा प्रवेश नियमातील लिंगभेद निर्माण करणारे स्त्री पुरुष प्रमाण ८०:२० वगळावे.
8. विद्यार्थी विद्यावेत वाढवण्यात यावे.
9. शासनमान्य सघटनेचे निवेदने प्रधान्याने विचारात घ्यावेत व नियमीत बैठक घेण्यात यावी.
10. बदली धोरणातून परिचारिकांना वगळण्यात यावे.
या सर्व मागण्यासहित आज पासून परिचारिका बेमुदत आंदोलन करित आहेत त्यामध्ये लातुर जिल्हातून ५३८ महिला व पुरुष कर्मचारी आंदोलनात सहभागी असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना राज्याचे राज्याध्यक्ष श्री.अरुण कदम(सा.आ.से), उपाध्यक्ष श्री भिमराव चक्रे, राज्यसरचिटणीस श्रीमती सुमित्रा , तोटे,राज्यखिजनदार श्री राम सुर्यवंशी, राज्यसंघटक पांडुरंग गव्हाणे, राज्य सदस्या श्रीमती सुकुमार गुडे,कोर कमिटी सदस्य योगेश वाघ, शिला कांबळे, सुरेखा लहाणे,लातुर शाखेच्या अध्यक्षा श्रीमती छाया चव्हाण ,उपाध्यक्ष श्री.संजीव लहाणे, श्रीमती रेणुका पाटील, सचिव भाग्येश्री जोगदंड, सहसचिव भगवान केंद्रे, खजिनदार श्रीमती बालीका सावंत, सहखजिनदार दिपक शिंदे, संभाजी केंद्रे , पाठवनिर्देशक अंजना गिरी, सुनीता गिरी,स्त्री रुग्णालय लातुर येथील सचिव श्रीमती आशा कुरुळेकर, संघटक श्रीला गोचडे व किरण निकम, मिना दैवज्ञ, निर्मला गाडेकर, धनश्री गोसावी, सतिश करे, ज्ञानेश्वर मुंडे, अमित मलिशे, संतोष केंद्रे,सुधाकर केदार,शरद वाडकर, शुभंम वानखेडे,हरिष वानखेडे, हरिष हिप्परकर, आनंद पवार, रवि मुदमे इ.उपस्थित होते.
Tags:
LATUR