Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

पुण्यासह लातूर ट्रॅव्हल्स व्यावसायिकांचा प्रवासी वाहतूक बंदचा इशारा

पुण्यासह लातूर ट्रॅव्हल्स व्यावसायिकांचा  प्रवासी वाहतूक बंदचा इशारा








लातूर : पुणे डिस्ट्रिक्ट लक्झरी बस असोसिएशनने १५ जून २०२५ पासून बेमुदत प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाला पाठिंबा देत लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनने या बंदमध्ये सहभागी होत असल्याचे जाहीर केले आहे.

पुणे शहरात येणाऱ्या सर्व खासगी प्रवासी बसवर निर्बंध घालण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. वाहतूक नियमांचे पालन, सर्वात जास्त कर आम्ही भरतो, सार्वजनिक प्रवासासाठी महत्वाचे योगदान असतानाही आमच्यावर ही अन्यायकारक कारवाई का केली असा प्रश्न पुणे येथील ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी केला आहे आणि या निर्णयाच्या निषेधार्थ येत्या १५ जून पासून खासगी प्रवासी बस बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे येथील ट्रॅव्हल्स व्यावसायिकांच्या प्रवासी वाहतूक बंद निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी लातूर ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या वतीने काल बैठक पार पडली. या बैठकीत बंद मध्ये सहभागी होत असल्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातील ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना सुद्धा प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून त्रास दिला जात असल्याचा आरोप यावेळी अनेक ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी केला. पोलीस आयुक्तांनी घेतलेला खासगी प्रवासी बस शहर बंदीचा निर्णय त्वरीत मागे घेण्यात यावा, शहरात येणाऱ्या खासगी बसेसना पिकअप पॉईंट निश्चित करावेत, वाहतूक पोलीस आणि परिवहन विभागाच्या वतीने करण्यात येत असलेल्या अन्यायकारक कारवाया थांबवण्यात याव्यात अशा मागण्या लातूर जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आल्या आहेत. असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सुनिल देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जुगलकिशोर तोष्णीवाल, जगदीश स्वामी, विश्वास कुलकर्णी, सोमनाथ मेदगे, सागर वाडकर, विठ्ठल जाधव, संतोष शिंदे, मदन केंद्रे, शफीक चौधरी, बाळू साबदे, योगेश माने, वाजीद शेख, नरेश घंटे, रवि कानगुले, दिलीप कांबळे, इम्रान शेख, गोविंद दायमा, अजित पस्तापुरे, इम्रान पटेल, जाकीर सय्यद आदींची उपस्थिती होती.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post