Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर पोलिसांचा "सेफ स्ट्रीट प्रोजेक्ट "


लातूर पोलिसांचा "सेफ स्ट्रीट प्रोजेक्ट "







             लातूर शहरामध्ये मुख्य रस्त्यांवर घडणारे अपघात व गुन्ह्यांमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ नये. सर्वसामान्य नागरीकांना सुरक्षित वातावरण प्रदान करणेसाठी व लातूर शहरातील विशेषतः मुख्य मार्गांवर प्रवास / ये-जा करणा-या नागरिकांना कोणताही उपद्रव अथवा असुरक्षितता वाटु नये, शहरातील सर्व रस्ते हे सर्व नागरिक महीला, पुरुष, वृध्द यांचेसाठी सुरक्षित असावेत यासाठी उपाययोजना म्हणून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या संकल्पनेतून लातूर शहरात *"सेफ स्ट्रीट प्रोजेक्ट "* राबविण्यात येत आहे.

            सदर प्रोजेक्ट मध्ये लातुर शहर उपविभागातील सर्व पोलीस स्टेशन व वाहतुक शाखा यांना त्यांचे हद्दीतील मुख्य रस्ते हे सेफ स्ट्रीट साठी दत्तक देण्यात आले आहेत.

                सदर " सेफ स्ट्रीट प्रोजेक्ट" मध्ये लातूर शहरातील पोलीस ठाणे शिवाजीनगर, एमआयडीसी, गांधी चौक, विवेकानंद चौक या पोलीस स्टेशनचा सहभाग असून नमुद पोलीस स्टेशनला त्यांच्या हद्दीमधील मुख्य रस्ते विभागून देण्यात आले आहे.
                सेफ स्ट्रीट प्रोजेक्ट दरम्यान खालील प्रकारचे कृत्य करणारे विरुध्द कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे.

1) रोडवर दारु पिणारे लोकांवर तसेच ड्रिंक अँड ड्राइव्ह करणारे वाहन चालक

2) रोडवर घडणारे गुन्हे जसे रोडवर गोंधळ घालने, चैन स्नॅचिंग, रोड रॉबरी सारखे गुन्हयांना प्रतिबंध करणे व अशा गुन्हेगारांविरुध्द कडक कारवाई.

3) रोडवरील उपद्रव जसे भरधाव वेगाने वाहन चालविणे, ट्रिपल सीट वाहन चालविणे, टगेगीरी करणे, रोडवर बथडे साजरे करणे अशा गुन्हयांना प्रतिबंध करणे.

4)रोडवर गटाने फिरुन आरडाओरडा करणारे किंवा महीला मुलींची छेडछाडीच्या घटनांना प्रतिबंध व कार्यवाही करण्यात येणार आहे.

5)सार्वजनिक रित्या शस्त्राचे प्रदर्शन करणाऱ्या विरुद्ध ही कार्यवाही करण्यात येणार आहे.

तसेच पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी शिवाजी नगर, एम.आय.डी.सी.गांधी चौक, विवेकानंद चौक व लातुर शहर वाहतुक शाखा यांच्याकडून नियमित नाकाबंदी, मोटार वाहन कायदा ड्राईव्ह, नियमितपणे गुन्हेगार चेक करणे, पायी पेट्रोलिंग व मोटार सायकल पेट्रोलिंग ईत्यादीचे आयोजन करुन भरीव व प्रभावी कारवाई करण्यात येत आहे. सदर स्पेशल ड्राईव्ह हा सध्या जुन 2025 या एका महीण्यासाठी राबविण्यात येत आहे.

पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी (लातूर शहर) रणजीत सावंत यांचे मार्गदर्शनात लातूर शहरातील पोलीस ठाणे स्तरावर 1 जून ते आज पर्यंत *"सेफ स्ट्रीट प्रोजेक्ट* अंतर्गत केलेली कारवाई पुढील प्रमाणे.

1) दारूबंदी कायद्यान्वये दाखल गुन्हे 13 दाखल करण्यात आले आहेत. 

2) महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत 84 लोकांवर प्रतिबंधक कारवाई केली आहे. 

3) मोटार वाहन कायद्यांतर्गत एकूण केसेस 942 दाखल करण्यात आले आहेत.

4) रहदारीस अडथळा करणाऱ्यावर 24 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

5)मद्यपान करून वाहन चालवल्या प्रकरणी 13 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

5)आस्थापना निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ चालू ठेवल्याने 07 दुकानदारावर खटले दाखल करण्यात आले आहेत. 

6) तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्या वर 08 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post