शिक्षणाधिकारी दत्तात्रय मठपती यांचा
राजमाता जिजामाता संकुलातर्फे सत्कार
लातूर : लातूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात सहाय्यक संचालक दत्तात्रय मठपती यांची जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारीपदी तर वर्ग-२ अधीक्षकपदी मधुकर वाघमारे यांची बदली झाल्याबद्दल राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाच्यावतीने फेटा बांधून, शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
दत्तात्रय मठपती यांनी नुकताच शिक्षणाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलाचे सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे यांच्या हस्ते त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तुळजाभवानी विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका स्वाती केंद्रे, तुळजाभवानी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य जी. आर. मुंडे, परमेश्वर गित्ते, शिवकांत वाडीकर आदी उपस्थित होते.