लातूर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने नुतन शिक्षणाधिकारी मठपती यांचा सत्कार
लातूर/प्रतिनिधी : लातूर येथील माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी म्हणून दत्तात्रय मठपती यांनी नुकताच पदभार घेतला. मठपती यांच्या नियुक्तीबद्दल लातूर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे यांनी मठपती यांचा यथोचित सत्कार केला. तसेच संस्थेच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी त्यांना निमंत्रणही देण्यात आले.
लातूरच्या एज्युकेशन हबचा संपूर्ण महाराष्ट्रात दबदबा आहे. शिक्षणाचा लातूर पॅटर्न देशभरात परिचित असून राज्यभरातील विविध भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी लातूर शहरात येतात.त्यामुळे येथील शिक्षण विभागाचे महत्वही तितकेच आहे. येथील माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून दत्तात्रय मठपती यांनी नुकताच पदभार घेतला. त्याबद्दल लातूर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे यांनी आपल्या सहका-यांसह शासकीय कार्यालयात जावून त्यांची भेट घेतली यावेळी संस्थेच्या वतीने शिक्षणाधिकारी मठपती यांचा सत्कार करून त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी विक्रम गोजमगुंडे यांनी लातूर एज्युकेशन सोसायटीच्या कार्याबाबत व शैक्षणिक उपक्रमांबाबत माहिती देवून विविध विषयांवर चर्चा केली. लातूर एज्युकेशन सोसायटीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा लवकरच सत्कार करण्यात येणार असून या सोहळ्यासाठी दयानंद मठपती यांनी उपस्थित रहावे अशी विनंती गोजमगुंडे यांनी केली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रल्हाद दुडीले, प्राचार्य संजय मलवाडे, मुख्य लिपीक अजय आरदवाड यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते.