गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळा उद्घाटनाची प्रतिक्षा संपली;लवकरचं मुख्य मंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
लातूर:जिल्हापरिषद मागील दोन वर्षापासून उभा टाकलेला लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा पुतळा उद्घाटनासाठी येथे निपचीत वाट पाहत उभा आहे.परंतू याबाबत प्रशासनातील आणि भाजपा मधील नेत्यांना याबाबत विचार करायला वेळ नव्हता.लातूर शहर हे जिल्हा अंतर्गत आहे म्हणनारे औश्याचे आमदार अभिमन्यु पवार आणि सध्या लातूर ची धुरा संभाळणारे यांना देखील लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळयाचा विसर पडला हे लातूरकरांचे दुर्दैव आहे .
यावर नुकत्याचं भाजपामध्ये ग्रामीण जिल्हाध्यपदी निवडून आलेल्या बस्वराज पाटील यांना लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळयाच्या उद्घाटना संदर्भात पत्रकार परिषद मध्ये प्रश्न केला असता वेळ काढूपणा करुन मला याबाबत माहिती नाही माहीती घेवून सांगतो म्हणाले हे वाक्य मात्र लातूरकरांना पचले नाही ज्या नेत्यांने भाजपा मध्ये आपले आयुष्य वेचले अश्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा पुतळा निपचित तिन वर्ष पडून राहिला आणि नवनिर्वाचित ग्रामीण जिल्हाध्यपदी रुजु झालेले बसवराज पाटील यांना माहिती नाही हे दुर्भाग्यचं म्हणावे लागेल परंतू यावर आमदार अभिमन्यु पवार यांनी भाष्य करणे अपेक्षित होते परंतू ते मुग गिळून गप्प राहिले .परंतू पत्रकार परिषद संपल्यानंतर मात्र निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी विषयाची गंभीरता लक्ष्यात घेवून आणि त्यांचे असलेले लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यावरचे प्रेम यामुळे त्यांनी पत्रकारांना शब्द दिला कि लवकरचं मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करणार असल्याचे सांगीतल्याने लातूरमधीलच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रातून त्यांचे कौतूक होत आहे.