काशिलिंगेश्वर नगर ग्रामपंचायतीस सरपंचपदाच्या आरक्षणातून वगळले निवडणूक लावण्यासाठी मा.जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सादर..
काशिलिंगेश्वर नगर ग्रामपंचायत मधील सर्व सन्माननीय नागरिकांना कळविण्यात येते की, दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गावच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत होऊन मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केले* गेले *परंतु आपल्या काशिलिंगेश्वर नगर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केले गेले नाही.
आपल्या ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यापासून म्हणजेच मागील ३ वर्षापासून स्थानिक प्रशासनामार्फत आपल्या या ग्रामपंचायत मध्ये निवडणूक घेण्याबाबत कसल्याही प्रकारची हालचाल दिसून येत नाही, प्रशासन कुठल्याही स्तरावर प्रयत्नशील असल्याचे दिसून येत नाही, संबंधित स्थानिक अधिकारी कुठल्या तरी राजकीय दबावाला बळी पडत असल्याचे एकंदर दिसून येत आहे. कारण आपल्या ग्रामपंचायत मधील मतदान केंद्रावर लोकसभा निवडणूकीत मतदान झाले, विधानसभा निवडणूकीत मतदान झाले, मग ग्रामपंचायतीची निवडणूक घेण्यास प्रशासनाला काय अडचण असावी ? हा प्रश्न निर्माण होतो.* लातूर तालुक्यातील *आपली ग्रामपंचायत ही १११ वी ग्रामपंचायत म्हणून उदयास आली, असे असताना आरक्षणाची सोडत मात्र ११० ग्रामपंचायतचीच झालेली आहे. कारण काय ?याबाबत अधिकाऱ्यांमार्फत काहीतरी वेगवेगळी उत्तरे दिली जात आहेत.
*वरील सर्व कारणांमुळे आपल्या सर्वांच्या वतीने मा.जिल्हाधिकारी मॅडम, मा.उपविभागीय अधिकारी मॅडम व मा.तहसीलदार साहेब यांना* आपल्या ग्रामपंचायतीची निवडणूक घेण्याबाबत *निवेदन सादर* करण्यात आले आहे. *हे निवेदन विशेषतः राज्याचे मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना देखील पाठवण्यात आले आहे.*
सदरचे निवेदन देताना आपल्या ग्रामपंचायतीचे संस्थापक, निर्माते ॲड.किरण बडे, ॲड.प्रभाकर केदार, महादेव जमादार, ॲड.सतिष धायगुडे, श्रीमंत भताने, रघुनाथ गिरी, उदय भैय्या गोजमगुंडे, अभिजीत मद्दे आदीजण उपस्थित होते.