ग्रिन बेल्ट वरिष्ठ अधिकार्यांच्या परवाणगीने अतिक्रमण- बांधले हाॅस्टेल;मग अधिकृत कि अनधिकृत!
याची नोंद नेमकी कशी करणार?...का ते पाडणार ?
लातूर : महापालिकेच्या हद्दीत तब्बल २५० ग्रीन
बेल्ट (हरित पट्टे) आहेत. त्यावर कोणी अतिक्रमणे केली आहेत का, ती सुरक्षित आहेत का, याचा शोध मागील दोन दिवसांपासून महापालिकेच्या नऊ पथकांकडून सुरू आहे. दुसऱ्या दिवशी (रविवारी दि.४) सर्व ग्रीन बेल्टची पाहणी पूर्ण झाली नसल्याने आणखी दोन दिवस महापालिकेची पथके त्यांचा शोध घेऊन त्यांचा तपशील उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांना सादर करणार आहेत.परंतू जे ग्रिन बेल्ट आपल्याच वरिष्ठांकडून अधिकृत करुन दिले आहेत आणि आता त्यावर टोलेजंग ईमारती बनविल्या आहेत त्याची नोंद नेमकी कशी करणार?...का ते पाडणार असा प्रश्न आता लातूरकर करत आहेत.
परंतू जे ग्रिन बेल्ट आपल्याच वरिष्ठांकडून अधिकृत करुन दिले आहेत आणि आता त्यावर टोलेजंग ईमारती बनविल्या आहेत त्याची नोंद नेमकी कशी करणार?...का ते पाडणार असा प्रश्न आता लातूरकर करत आहेत.लातूर शहरात टयुशन एरिया मध्ये अतिशय नावाजलेल्या महाविद्यालयाने ग्रिन बेल्ट वर अतिक्रमण करुन महापालिकेतील वरिष्ठ अधिकार्यांच्या मदतीने अधिकृत करुन दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून यावर आता सहा मजली टोलेजंग ईमारत उभी टाकली आहे.दुसरीकडे एका जुन्या आणि नावाजलेल्या शाळेने अशीच ग्रिन बेल्ट वर अतिक्रमण करुन त्याठिकाणी पाच मजली टोलेजंग ईमारत बांधून वस्तिगृह चालवत आहेत.अशा अनेक ठिकाणी असेच प्रकार घडले असल्याची शक्यता नाकारता येत नाहीत .हे अतिशय गंभीर असूनवरिष्ठांकडूनचं अधिकृत करुन दिले असल्याने आता याची नोंद नेमकी कशी करणार?...का ते पाडणार असा प्रश्न आता लातूरकर करत आहेत.
लातूर शहरात टयुशन एरिया मध्ये अतिशय नावाजलेल्या महाविद्यालयाने ग्रिन बेल्ट वर अतिक्रमण करुन महापालिकेतील वरिष्ठ अधिकार्यांच्या मदतीने अधिकृत करुन दिल्याची धक्कादायक माहिती समोर येत असून यावर आता सहा मजली टोलेजंग ईमारत उभी टाकली आहे.दुसरीकडे एका जुन्या आणि नावाजलेल्या शाळेने अशीच ग्रिन बेल्ट वर अतिक्रमण करुन त्याठिकाणी पाच मजली टोलेजंग ईमारत बांधून वस्तिगृह चालवत आहेत.अशा अनेक ठिकाणी असेच प्रकार घडले असल्याची शक्यता नाकारता येत नाहीत .हे अतिशय गंभीर असून
वरिष्ठांकडूनचं अधिकृत करुन दिले असल्याने आता याची नोंद नेमकी कशी करणार?...का ते पाडणार असा प्रश्न आता लातूरकर करत आहेत.
शहरात महापालिकेच्या मालकीचे अनेक हरित पट्टे (ग्रीन बेल्ट) सोडण्यात आले आहेत. त्यातील अनेक ग्रीन बेल्टवर काहींनी अतिक्रमणे केली आहेत. त्याचप्रमाणे काही ग्रीन बेल्ट धार्मिक संस्थांनी ताब्यात घेतले आहेत. हरित पट्टे नेहमीच हरित राहून स्वच्छ हवा मिळावी, यासाठी सोडण्यात आलेले असतात. परंतु, अलिकडील काही वर्षांत हे ग्रीन बेल्ट अतिक्रमित झाल्याचे पालिकेच्या लक्षात आले आहे. त्यामुळे पालिका उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांनी शहरातील सर्वच २५० ग्रीन बेल्टची तपासणी करून त्याचे जिओ टॅगिंग करण्याचे ठरविले आहे. त्याची गूगलवर ऑनलाईन नोंद होणार आहे. भविष्यात ग्रीनबेल्टचा शोध घेतल्यानंतर सर्वच ग्रीन बेल्टचा चतुःसीमांसह संपूर्ण ग्रीन बेल्ट एकाच क्लिकवर दिसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मागील दोन दिवसांपासून शहरातील २५० ग्रीन बेल्टचा शोध महापालिकेच्या नऊ पथकांकडून सुरू आहे. दोन दिवसांत या पथकांनी दिवसभर फिरून - शोध घेतला. परंतु, संपूर्ण ग्रीनबेल्टपर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. यामुळे आणखी दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.