आर टी ओ कार्यालयातील वीज बंद करुन कामात अडथळा;एका विरूद्ध गुन्हा दाखल
आरटीओ कार्यालयतील त्या व्यक्ति चा आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा वाद आता चव्हाट्यावर आला असून, भ्रष्टाचारी अधिकारी म्हणून तक्रारी,आंदोलने केल्यानंतर,तो व्यक्ति खंडणीखोर असे वरिष्ठांकडून हिनवल्यानंतर हा वाद चिघळल्यानंतर आता गुन्हेदाखल करण्यापर्यंत पोहचलाआहे. नेमके हे प्रकरण कोणत्या दिशेला जाणार ते वेळचं ठरवणार आहे.
लातूर :
कामकाजाची वेळ संपली काम बंद करा, असे म्हणत एकाने आरटीओ कार्यालयातील उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या कॅबीनची वीज बंद करून हुज्जत घातल्याची घटना गुरूवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात रात्री उशिरा एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, आरटीओ कार्यालयात गुरुवारी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या फिर्यादी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशिषकुमार अय्यर यांच्या कक्षात येऊन कार्यालयीन वेळ संपली काम बंद करा, अशी अरेरावी केली. त्यानंतर पुन्हा ५ मिनिटांनी कक्षाजवळ येऊन सर्व लाईट बंद करून निघून गेला. त्यामुळे कक्षात अंधार झाल्याने कामकाजात अडथळा निर्माण झाला.
त्यावेळी माझ्या कक्षात परिक्षाविधीन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक भराट, मोटार वाहन निरीक्षक अंजली पाथरे, सत्यवान यलमटे, वरिष्ठ लिपीक दिलीप कांबळे कार्यालयीन कामासाठी उपस्थित होते. त्यानंतर पुन्हा ६ वाजता तो ईसम कक्षात आला असता लाईट का बंद केली, अशी विचारणा केली असता ऑफिस टाईम संपला आहे, तुम्हाला कामकाज करता येणार नाही, असे सांगत कार्यालय बंद करावे म्हणून माझ्यासमोर इतरांना फोन करून बाहेरील व्यक्तींना कार्यालयात येण्याबाबत सांगून द्वेशभावना निर्माण करून जोरजोरात हुज्जत घातली.
त्याच्या स्वतःचे किंवा संघटनेचे कोणतेही काम नसताना दररोज माझ्या कक्षात येऊन मानसिक त्रास देत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अय्यर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यानुसार त्या व्यक्ति वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.