कसं काय बर हाय का..?असंचं जनू म्हणत राजे निघून गेले !पाण्यासाठी तहानलेले लातूरकर पुन्हा ....तहानलेलेचं
टक्केवारी खावून भ्रष्टाचाराचे विष पचवणारे 'निलकंठ'अधिकारी भटकवतात पाण्यावरचे लक्ष!
लातूर: लातूर चे राजकाण दिवसेंदिवस खराब होत चालले ले आहे त्यामध्ये अधिकारी मात्र आपली पोळी भाजून घेत आहेत.नेमके कोणाचे ऐकांव आणि कोणाचे नाही यात अधिकार्यांना संभ्रम निर्माण होत आहे.लातूर मध्ये आता ग्रामीण आणि शहरी असे दोन पक्षाचे आमदार असल्याने नविन वाद निर्माण होत आहेत.कामाचे श्रेय लाटण्याकडे सध्या त्यांचे लक्ष लागले आहेत.सर्वसामान्य लातूरकर पाण्यासाठी वनवन फिरत असताना मात्र पालकमंत्री मोहोदय यांच्याकडे या गंभीर प्रश्नावर विचार करायला वेळ नाही हे अतिशय खेदाने म्हणावे लागत आहे.
जिल्ह्याचे पालकत्व म्हणजे एका जिल्ह्यातील कामकाजाची जबाबदारी शासनाने एखाद्या मंत्र्याकडे सोपवणे. या मंत्र्याला त्या जिल्ह्यातील पालकमंत्री म्हणून ओळखले जाते. पालकमंत्री आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी योजना बनवतात, त्यांची अंमलबजावणी करतात आणि तेथील समस्यांवर उपाय शोधतात. मात्र असे लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले ' राजे' पाण्याच्या समस्यावर उपाय मात्र शोधताना दिसत नाहीत.लातूर मध्ये बांधकाम विभागात कामा मध्येअधिकारी टक्केवारी खावून हे भ्रष्टाचाराचे विष पचवणारे 'निलकंठ'अधिकारी जो पर्यंत आहेत तो पर्यंत पालकमंत्री यांचे लक्ष दुसरीकडे जावू देणार नाहीत.या 'निलकंठा'चा पोषिता औश्या मध्ये असल्याने तो अधिकारी स्त:ला मुख्यमंत्री चं समजू लागला आहे.मग काय..?निधी आणायचां आणि टक्केवारी घेवून खर्च करायचा एवढंच बाकी राहते.यावर पालक मंत्री राजे यांना मात्र मुग गिळून गप्प राहावे लागते पालकमंत्री असल्या कारणांनी त्यांना उद्घाटन करावी लागतात हे सध्या खेदाने बोलावे लागत आहे.
पाण्यावर बोलायला आणि त्यावर उपाय शोधायला नेमका कोणत्या मंत्र्यांना आणि अधिकार्यांना बोलवावे यासाठी एक सरकारने समिती नेमावी अशीचं परिस्थिति सध्या निर्माण झाली आहे.
कसं काय बर हाय का..?असंचं जनू म्हणत राजे निघून गेले आणि पाण्यासाठी तहानलेले लातूरकर मात्र पुन्हा ....तहानलेलेचं राहिले