प्रादेशिक परिवहन अधिकार्यांकडून परिवहन आयुक्ताच्या आदेशाला केराची टोपली..!
लातूर -लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये सध्या मोटार वाहन निरिक्षक फक्त कागदावर ..काम मात्र सहाय्यक निरिक्षकावर अशी जोरदार चर्चा चालू असल्याने कार्यालयात एकचं खळबळ उडाली आहे.
लातूर परिवहन कार्यालयात वाहनाचे योग्यता तपासणे आणि वाहनांचे ड्रायविंग टेस्ट घेणे या साठी मोटार वाहन निरिक्षकाची अवश्यता असते मात्र तसे न होता त्याठिकाणी सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक यांना कामे लावली जात असल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे.
अशा गोष्टी मुळे या कार्यालयात भ्रष्टाचारास खतपाणी मिळत असल्याची चर्चा होत आहे.
लातूर मध्ये मोटार वाहन निरीक्षक संवर्गाचे ११ मोटर वाहन निरिक्षक कार्यरत आसुन त्यांच्या ४०% कार्यालयीन कामकाजाकरिता असणे असे परिवहन आयुक्ताचा आदेश असताना मात्र सध्या तसे होताना दिसत नाही उलट या शासनाच्या नियमाला कोलदांडा दिला जातअसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.या मधुन मोठी आथिर्क ऊलाढाल होत आसलेलया चर्चेला उधाण आले आहे
प्रादेशिक परिवहन अधिकार्यांकडून परिवहन आयुक्ताच्या आदेशाला केराची टोपली..! दिली जात असल्याचे दिसत आहे