Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

जमिनीचे वर्ग-१ मध्ये रूपांतर करण्यासाठी मागितली तब्बल ४१ लाखांची लाच;५ लाखांची लाच घेताना निवासी उपजिल्हाधिकारी जाळ्यात

जमिनीचे वर्ग-१ मध्ये रूपांतर करण्यासाठी मागितली तब्बल ४१ लाखांची लाच;५ लाखांची लाच घेताना निवासी उपजिल्हाधिकारी जाळ्यात

जमिनीचे वर्ग-१ मध्ये रूपांतर करण्यासाठी मागितली तब्बल ४१ लाखांची लाच; महसूल सहायकही अडकला



छत्रपती संभाजीनगर: इनामी जमीन

वर्ग २ मधून वर्ग १ करून चलन जनरेट करण्यासाठी तब्बल ४१ लाख रुपयांची लाच मागितल्यानंतर २३ लाख रुपये यापूर्वी घेऊन उर्वरित १८ लाखांपैकी ५ लाखांची लाच स्वीकारताना निवासी उपजिल्हाधिकारी (आरडीसी) विनोद गोंडूराव खिरोळकर आणि महसूल सहायक दिलीप त्रिभुबन यांना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि.२७) जिल्हाधिकारी कार्यालयात ही कारवाई केली. आरोपी खिरोळकर याच्या घराची झडत

घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील ४९ वर्षीय तक्रारदार आणि त्यांचे भागीदार यांनी मौजे तिसगाव येथील ६ एकर १६ गुंठे ही वर्ग २ ची जमीन

शासनाची परवानगी घेऊन रजिस्ट्री खरेदी खत करून २०२३ मध्ये मध्ये विकत घेतलेली आहे. ही जमीन वर्ग २ ची असल्यामुळे ती वर्ग १ करण्यासाठी शासनास लागणारे चलन जनरेट करून देण्यासाठी यापूर्वी आरोपींनी २३ लाख रुपये घेतले होते. या जमिनीच्या नजराण्याचा दुसरा टप्पा पुंन्हा शासनाकडे भरावयाचा होता. त्यासाठी लागणारे चलन जनरेट करून देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर आणि महसूल सहायक दिलीप त्रिभुवन यांनी १८ लाखांची मागणी केली होती.

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला. २६ मे रोजी या तक्रारीची पडताळणी केली असता खिरोळकर यांच्या केबिनमध्ये पहिल्या टप्प्यात ५ लाख रुपये आणि फाईल पूर्ण झाल्यानंतर १३ लाख रुपये देण्याचे ठरले. २७ मे रोजी तक्रारदाराला आरोपी त्रिभुवन याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रोडवर ५ लाखांच्या लाचेची रक्कम घेऊन बोलावले होते. एसीबीने या परिसरात सापळा रचला. तक्रारदाराकडून ५ लाख रुपये स्वीकारताना पथकाने दिलीप त्रिभुवनला अटक केली. यानंतर स्वतंत्र पथकाने विनोद खिरोळकर यांना ताब्यात घेतले. दोघांविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खिरोळकर यांच्या अंगझडतीमध्ये आयफोन आणि केबिनमध्ये रोख ७५ हजारांची रक्कम आढळून आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण, गोरखनाथ गांगुर्डे, दिलीप साबळे, अमोल धस, केशव दिंडे, चेनसिंग घुसिंगे, राजेंद्र सिनकर, अनवेज शेख, युवराज हिवाळे, घुगरे, काळे, जिवडे, कंदे, डोंगरदिवे, इंगळे, राम गोरे, बनकर आणि नागरगोजे यांनी केली आहे 

खिरोळकरच्या घरात सापडले ६७ लाखांचे घबाड

छत्रपती संभाजीनगर : पाच लाखांची लाच घेताना निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर आणि महसूल सहायक दिलीप त्रिभूवन या दोघांना मंगळवारी दुपारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्यानंतर खिरोळकर याच्या घराच्या झडती घेण्यात आली. यामध्ये तब्बल ६७ लाख रुपयांचे घाबाड आढळून आले आहे. यामध्ये रोख १३ लाख ६ हजार ३८० रुपये, ५९ तोळे सोने (५८९ ग्रॅम) ज्याची किंमत अंदाजे ५० लाख ९९ हजार ५८३ रुपये, चांदिचे दागिने ३ किलो ५५३ ग्रॅम ज्याची किंमत ३ लाख ३९ हजार ३४५ रुपये अशी एकूण ६७ लाख ४५ हजार ३०८ रुपयांचा मुद्देमाल मिळाला आहे.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post