Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

मांजरा परिवाराकडून माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधींना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

मांजरा परिवाराकडून माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधींना
स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन



भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज, बुधवार दि. २१ मे रोजी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना स्थळी त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी राज्याचे माजी मंत्री, सहकार महर्षी आणि मांजरा साखर कारखान्याचे चेअरमन दिलीपराव देशमुख, तसेच राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी राजीव गांधींच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
या अभिवादन कार्यक्रमास विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन माजी आमदार वैजनाथ शिंदे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अनंतराव देशमुख, संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्याम भोसले, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन अशोक काळे, जागृती शुगरचे व्हा. चेअरमन लक्ष्मण मोरे, ट्वेंटीवन शुगरचे व्हा. चेअरमन विजय देशमुख, रेणा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन ॲड. प्रवीण पाटील, संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सचिन पाटील, सचिन दाताळ, माध्यम समन्वयक हरिराम कुलकर्णी यांच्यासह मांजरा साखर परिवारातील कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
--

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post