Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

दिल्लीतील विजयाबद्दल आम आदमी पार्टीतर्फे लातूरमध्ये जल्लोश

 


दिल्लीतील विजयाबद्दल आम आदमी पार्टीतर्फे
लातूरमध्ये जल्लोश


लातूर -देशाची राजधानी दिल्लीच्या सुजाण नागरिकांनी  विधानसभेच्या निवडणुकीत  मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या लोकोपयोगी कामाची प्रत्यक्ष अनुभूती घेवून आप ला सलग तिसर्‍यांदा विक्रमी मतांनी  विजयी करु, देशाच्या नागरिकांना यापुढे आपल्या मुलभूत प्रश्‍नांवर व देशाच्या विकासाच्या मुद्यांवर मतदान करावे असा जणू संदेशच दिला .
आम आदमी पार्टीच्या दिल्लीतील केलेल्या कार्यावर जनतेने मतदानरूपी घवघवीत यश मिळवून दिले अन् आम आदमी पार्टीने सर्वाधिक जागा मिळवुन यश संपादन केले.त्याबद्दल आम आदमी पार्टी लातूर तर्फे
शहरातील गांधी चौक येथून बाईक रॉली काडून शरातील विवेकंनद चौक, बसवेशवर चौक, राजीव गांधी चौक,पीव्हीआर चौक, रेणापूर नाका, शिवाजी चौक, अशी बाईक रॉली काडून  गांधी चौक येथे  सपन्न झाली तसेच पेढे वाटून व फटाके वाजवून जल्लोष साजरा केला.
यावेळी  आपचे शफी चौधरी,दिपक कानेकर, सुमित दिक्षीत, अश्‍वीन नलबले,शिवलिंग गुजर, बाळ होळीकर,विक्रंात शंके, हरी गोटेकर, नितीन चालक, शाहरूखा शेख, नैमोद्ीन शेख, जफर पठाण,बालाजी झरकर, निकीता झरकर, दिपक मस्के, इम्रान पटेल, अन्वर शेख, राज शेख, विनोद धायगुडे, जावेद शेख,सुमेध काझी, शाहिद शेख, अमिर पठाण, आनस शेख यांच्यासह आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  


Previous Post Next Post