"चिकन"चा बाजार बसवण्यासाठी डॉ.कदम यांचा केविलवाणा प्रयत्न.
लातूर- लातूर शहर व जिल्ह्यातील चिकन व्यवसायावर बराच प्रतिकूल परिणाम झाला आहे. नेहमी दैनंदिन १० ते १२ टन चिकनची मागणी लातूर शहरात तर जिल्हाभरात साधारणतः ३० ते ३२ टन चिकनची विक्री होत असे. मात्र, सध्यस्थितीत ही मागणी ५० ते ६० टक्क्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे चिकन व्यवसाय आर्थिक संकटात सापडला असून सांगितल्या जाणाऱ्या कोरोना व्हायरसचा आणि चिकनचा कोणताही संबंध नसल्याचे शास्त्रीय कारणासहीत माहिती या पत्रकार परिषदे मध्ये देण्यात आली,परंतू राज्यात कुक्कुट पालन व्यवसायांशी लाखोंच्या संख्येने शेतकरी बांधव संबंधित आहेत असे सांगून शाशनाची भूमिका स्पष्ट करुन चिकन बाजार बसवण्यासाठी पशूपालन आयुक्त डॉ. नाना साहेब कदम यांनी केविलवाणा प्रयत्न केल्याचे दिसले.अधिकार्याच्या म्हणन्या नूसार करोना व्हायरस ४५%तापमानापर्यंत जिवंत राहू शकतो असे सांगीतले मात्र तो चिकन ला त्या व्हायरसची लागन होत नाही असे कुठेही उल्लेख नाही, फक्त आपण 100%तापमानामध्ये चिकन शिजवून खात असल्यामुळे तो विषाणू जिवंत राहू शकत नाही हे स्पष्ट केले.एकंदरितच काय तर करोडोंचा चिकन चा धंदा ठप्प झाल्याने,परेशान झालेल्या व्यवसायीकांनी शासनाच्या अधिकार्यांना सोबत घेवून आपला धंदा वाचवण्याचा प्रयत्न झाला असल्याचे दिसले.