Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी लातूर शहर तर्फे सरकारच्या गॅस दरवाढिचा जाहीर निषेध

 


राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी लातूर शहर तर्फे सरकारच्या गॅस दरवाढिचा जाहीर निषेध


लातूर- जनता अगोदरच महागाई ने त्रस्त आहे आणि यामध्ये मोदी सरकार वेळोवेळी गॅस दरवाढ करत आहे एकीकडे धुरमुक्त देश बनवण्याच्या घोषणा करतात आणि दुसरीकडे मात्र गॅस किमतीत अतोनात वाढ करतात या सर्व योजना केंद्र सरकारच्या फसव्या आहे कारण 100 रुपयात गॅस देणार असे सांगतात पण प्रत्यक्षात मात्र एक सिलेंडर साठी 845 रुपये मोजावे लागतात । याला कसला मोफत गॅस म्हणायचे असा सर्व सामान्या पुढे प्रश्न पडला आहे ।गॅस दरवाढ विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या शहराध्यक्षा रेखाताई कदम यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निदर्शने करण्यात आली त्यावेळी -- कालिंदि सूर्यवंशी, मनीषा कोकणे,सरिता पवार,संगीता पांढरे, सरोजा पाटील,सत्यभामा सुरवसे, सौ गायकवाड, मधुमती शिंदे,नंदा शेळके, रेखा लोखंडे इत्यादी महिला कार्यकर्त्यांनी या निदर्शनात सहभागी होत्या।


Previous Post Next Post