नॅशनल हायवे गुत्तेदाराची मूजोरी,रोडचे काम करत असताना बी.एस.एन.एल ची केबल तोडून केले लाखोंचे नूकसान
लातूर- सध्या पि व्हि आर टाॅकीज च्या समोरून जाणार्या रोडचे काम चालू असून,हे काम नॅशनल हायवे कड़े आहे.या कामाचे गुत्ते अजय दिप न कंन्शट्रक्शन या कंपनीकडे असून,हे काम करत असताना बी एस एन एल ची केबल तोडून त्यांनी लाखोंचे नूकसान केले असल्याचे बी एस एन एल अधिकार्याकडून सांगण्यात आले आहे.हि केबल तूटल्यामूळे जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधिक्षक निवासत तसेच महिला तंत्रनिकेतन याठिकाणचे कनेक्शन बंद पड़ले आहेत.मात्र या मुजोर गुत्तेदाराला त्याचे काहीही गांभीर्य नसल्याचे दिसते.आधीच डबघायीला आलेले बी एस एन एल कार्यालय त्यावर हा लाखोंचा बोजा पडला असल्याचे सांगितले जात आहे.माननिय जिल्हाधिकार्यानी आशा मूजोर गुत्तेदारांवर वेळीच लगाम लावून त्याच्याकडून दंड वसूल करावा अशी आता सर्वसामान्यातून भावना होत आहे.
बी एस एन एल अधिकारी श्री सुहास स्वामी यांच्याशी फोटो क्राईम न्यूज ने संपर्क केला असता त्यांनी सांगीतले कि,आमच्या केबलचे व कनेक्शन बंद पडल्यामूळे 10लाखांचा महसूल बूडाला असून आम्ही त्या गुत्तेदाराला 10लाखांच्या नूकसानीची नोटिस देणार असल्याचे स्पष्टकेले,तर तात्काळ केबल जोडण्याचे काम चालू केले असल्याचे त्यांनी सांगीतले.त्यांच्या सोबत श्रीमती देशमाने व बालाजी टोंपे हे होते.