सर्वचं पक्षातील संभाव्य उमेदवारां मध्ये हड़कंप..! अनधिकृत बांधकाम असल्यास राहणार नाही नगरसेवक पद
लातूर- लातूर महानगरपालिका निवडणूकीचे बिगूल वाजताच संभाव्य नगरसेवकांमध्ये पक्षाच्या टिकिटा साठी धावपळ चालू आहे.आप आपल्या प्रभागामध्ये फिरुन नागरिक आपल्या बाजूने कसे उभे आहेत हे दाखवण्याकडे कल सर्वच पक्षातील संभाव्य उमेदवार करत आहेत परंतू यामध्ये आता नवा आणि धक्कादायक मोड आला आहे की शासनाने काढलेल्या १२ डिसेंबर २०२५ च्या आदेशाने सर्वचं पक्षातील संभाव्य उमेदवारां मध्ये हड़कंप उडाला आहे.या आदेशाने मोठमोठ्या दिग्गज उमेदवारांचे पक्षामधून टिकिटही कापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.हा भुकंप एवढा परिणामकारकं असणार आहे की,अपक्ष आणि छोट्या पक्षातील लहान सहान उमेदवारांना नवसंजिवनी मिळणार असून त्यामुळे सध्या १०००वर असलेले अर्ज दुप्पट होतील आणि नविन उमेवारांना पक्ष नाईलाजाने टिकिट वाटप करतील अशी शंका आता जाणकार व्यक्त करत आहेत.
आता आपण फार्म भरताणा उमेदवाराने दिलेले शपथपत्र पाहूत...
मी शपथेवर सांगतो/सांगते की, -
१. वरील मजकूर माझ्या माहिती व समजुतीप्रमाणे सत्य व अचूक आहे. यातील कोणताही भाग खोटा नसून त्यामध्ये कोणतीही महत्वाची वस्तुस्थिती लपविण्यात आलेली नाही,
२. दिनांक १२ सप्टेंबर २००१ नंतर माझ्या एकूण मुलांच्या संख्येत भर पडून ती दोनपेक्षा जास्त झाल्यास मी उपरोक्त स्थानिक स्वराज्य संस्थेचा सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरेन याची मला जाणीव आहे.
३(अ). निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात कसूर केल्यास माझी निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द होईल आणि मी त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा सदस्य राहण्यास अनर्ह/अपात्र ठरेन याची मला जाणीव आहे.
३(ब). निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या मुदतीत जात पडताळणी समितीने दिलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर करीन अशी हमी देत आहे.
४. निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या कालावधीमध्ये निवडणूक खर्चाचा हिशोब विहित पद्धतीने सादर न केल्यास मी त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा सदस्य राहण्यास अनर्ह/अपात्र ठरेन याची मला जाणीव आहे
५. यथास्थिती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम १०/मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम १६ मधील तरतुदींचे मी वाचन केले असून त्यानुसार मी महानगरपालिका सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी अपात्र नाही. मी स्वतः अथवा माझी पत्नी/माझे पती/माझे अवलंबित यांनी कोणतेही अनधिकृत बांधकाम केलेले नाही. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम १० (१७)/मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम १६(१७) मधील तरतुदीनुसार जर मी निवडून आल्यावर अनधिकृत बांधकाम केले असल्याचे सिध्द झाल्यास मी नगरसेवक पदावर राहण्यास अनर्ह ठरेन, याची मला जाणीव आहे.
६. सदर निवडणूक, मी मुक्त, निर्भय व पारदर्शकरित्या लढविन तसेच सदर निवडणुकीमध्ये, मी किंवा माझ्यावतीने कोणीही व्यक्ती, कोणत्याही प्रकारच्या भ्रष्ट मार्गाचा अवलंब करणार नाही आणि जर मी किंवा माझ्यावतीने कोणीही भ्रष्ट मार्गाचा अवलंब केला असल्याचे आढळून आल्यास मी कारवाईस पात्र राहीन.
स्थळ:-
दिनांक:-
(उमेदवाराची सही किंवा अंगठ्याचा ठसा)
पडताळणी
मी वर नमूद केलेला अभिसाक्षी, तपासणी करून घोषित करतो की, या शपथपत्रातील मजकूर माझ्या माहिती व समजुतीप्रमाणे सत्य व अचूक आहे. यातला कोणताही भाग खोटा नसून, त्यापासून कोणतीही महत्त्वाची वस्तुस्थिती लपविण्यात आलेली नाही.
अश्या प्रकारे उमेदवाराने शपथपत्रे वाचून सही करून दिली आहेत
आता राज्य निवडणूक आयोगाचा आदेश पाहूत...
आदेश
राज्य निवडणूक आयोगाच्या दि. २६ सप्टेंबर, २०२३ च्या आदेशान्वये अनधिकृत बांधकाम केल्याचे सिध्द झाल्यास उमेदवार अनर्ह ठरु शकतो. याअनुषंगाने दि. १३ ऑगस्ट, २०१८ च्या आदेशासोबतच्या शपथपत्रातील मुद्दा क्र. १६.५ मध्ये सुधारणा केली आहे. सदर सुधारणा अंतर्भूत करण्याकरीता राज्य निवडणूक आयोगाने दि. १२ डिसेंबर, २०२५ काढलेल्या आदेशातील खालील मद्दा
यथास्थिती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम १०/मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम १६ मधील तरतुदींचे मी वाचन केले असून त्यानुसार मी महानगरपालिका सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी अपात्र नाही. मी स्वतः अथवा माझी पत्नी/माझे पती/माझे अवलंबित यांनी कोणतेही अनधिकृत बांधकाम केलेले नाही. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम १० (१७)/मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ च्या कलम १६ (१ड) मधील तरतुदीनुसार जर मी निवडून आल्यावरअनधिकृत बांधकाम केले असल्याचे सिध्द झाल्यास मी नगरसेवक पदावर राहण्यास अनर्ह ठरेन, याची मला जाणीव आहे."
त्यामुळे आता आपोआपच सर्वचं पक्षातील ग्रिनबेल्ट वर बांधलेले घरे (त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी) असलेले संभाव्य उमेदवार, अनधिकृत बांधकाम (त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी) असलेले संभाव्य उमेदवार यांचे टिकिट कापले जाणार? अश्यांना जर टिकिट मिळाले तर...समजा ते निवडून आले आणि हा मुद्दा उचलून कोणी कोर्टात गेले तर ते अपात्र होतील..या मुळे कोणता पक्ष हि चुक करेल असे वाटत नाही.या आदेशाने आता नवनिर्वाचित उमेदवारांना नक्कीच लाभ होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
Tags:
LATUR