Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

महानगरपालिकेच्या नवनियुक्त उपायुक्त वसुधा फड यांनी स्वच्छता विभागाच्या कामाचा घेतला आढावा

महानगरपालिकेच्या नवनियुक्त उपायुक्त वसुधा फड यांनी स्वच्छता विभागाच्या कामाचा घेतला आढावा

 


लातूर/प्रतिनिधी : दिनांक २०/११/२०२५ रोजी लातूर शहर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी याच्या आदेशानुसार नवनियुक्त उपायुक्त वसुधा फड यांनी स्वच्छता विभागाचा नुकताच पदभार घेतला आहे त्यांनी स्वच्छता विभागातील अधिकारी,मुख्य स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, कंत्राटदार यांच्या कडून दैनंदिन कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. शहरातील नेहमी कचरा पडणारी ठिकाणाचे (GVP Point) सुशोभीकरण करण्यासाठी स्वच्छता निरीक्षक यांनी नाविण्यापुर्वक कल्पना सुचवणे व त्या अंमलात आणणेबाबत निर्देश देण्यात आले.

शहरातील मुख्य रस्त्यावरील साफसफाई सकाळी ९ च्या आगोदर झाली पाहिजे असे ठेकेदाराला निर्देश दिले. शहरातील मोकळ्या जागेत, रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कार्यवाही करणे.घरामधून ओला,सुका कचरा विलगीकरण करून न देणाऱ्या नागरिकांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम घेण्याचे सांगण्यात आले.

सदरील बैठकीस मुख्य स्वच्छता अधिकारी कलीम शेख, स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे मुख्य स्वच्छता निरीक्षक रवी कांबळे,धोंडीराम सोनवणे,शिवराज शिंदे,अक्रम शेख, शहर समन्वयक रोहित पांचाळ यांच्यासह इतर स्वच्छता निरीक्षक,कर्मचारी उपस्थित होते.

लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती मानसी याच्या आदेशानुसार लातूर शहरामध्ये सिंगल युज प्लास्टिक बंदीची मोहीम राबविण्यात असताना सिंगल युज प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानदार,विक्रेते,फुल विक्रेते, स्थानिक बाजारपेठा, भाजीपाला मंडई,आस्थापना यांची तपासणी करण्यात आली त्यात एकूण ११० आस्थापानाची झडती घेण्यात आली तसेच दुकानदारांना १६५०० दंड आणि एकूण २०० किलो सिंगल युज प्लास्टिक जप्ती करण्यात आले.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post