राज्यातील सर्व शाळांची एकाच वेळी पट पडताळणी होणार!
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचलनालयाने महत्त्वाचा आदेश जारी करत राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती व त्यांची पोर्टलवरील नोंद यांची व्यापक पडताळणी होणार.
🔍 पडताळणीचे कारण काय?
गेल्या काही वर्षांपासून अनेक शाळांकडून —
▪ पोर्टलवर दाखवलेली विद्यार्थीसंख्या
▪ प्रत्यक्ष वर्गात उपस्थित विद्यार्थी
या दोन्हीमध्ये मोठा फरक असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
यामुळे:
✔ बनावट विद्यार्थी दाखवणे
✔ शाळांना मिळणाऱ्या अनुदानात गैरव्यवहार
✔ शिक्षकांची अनावश्यक पदे वाढवणे
✔ शासनाचा आर्थिक तोटा
🏫 आता पुढे काय होणार?
शालेय पोर्टलवरील डेटा पडताळणीसाठी तिन्ही स्तरांवर तपासणी केली जाणार:
1️⃣ शाळा स्तर
मुख्याध्यापक व वर्गशिक्षकांनी
सर्व माहिती पुन्हा तपासून
चुकीच्या नोंदी दुरुस्त करणे
अनुपस्थित/शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांची नोंद अद्ययावत करणे
2️⃣ गटशिक्षणाधिकारी स्तर
शाळांना केंद्र प्रमुख, विस्ताराधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी भेट देऊन प्रत्यक्ष उपस्थित विद्यार्थ्यांची पडताळणी
हजेरी व पोर्टल डेटा तुलना आवश्यक तिथे निर्देश व दुरुस्ती करणार
3️⃣ राज्यस्तरावर एकाचवेळी विशेष तपासणी
विशेष पथक अचानक शाळांना भेट देणार
प्रत्यक्ष उपस्थितीची पडताळणी
पोर्टलवरील डेटाशी मेळ तपास
👉 चुकीची माहिती भरलेली असल्यास संबंधित मुख्याध्यापक , केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
👉 दाखल नसलेल्या विद्यार्थ्यांची नावं पोर्टलवर टाकल्यास गंभीर गुन्हा मानला जाणार आहे.
👉 चुकीची नोंद दिसताच तत्काळ दुरुस्ती करणे बंधनकारक.
📅 गटशिक्षणाधिकाऱ्यांद्वारे अंतिम पडताळणी १५ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश.
Tags:
Ahmadpur
AKOLA
AURANGABAD
BEED
Breaking
Ch.Sambhajinagar
GOVERNMENT GR
JALNA
LATUR
LEKH
Nilanga
PARALI VAIJANATH
PUNE
SAMBHJI NAGAR
SANGLI
SATARA
