भाजपाच्या प्रचार शुभारंभ पदयात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद
रेणापूरात विकास कामाच्या आधारावर विजय निश्चित भाजपाचे युवा नेते ऋषिकेशदादा कराड
लातूर दि. २१ - रेणापूर नगरपंचायत निवडणुकीतील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष युवा नेते ऋषिकेशदादा रमेशआप्पा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार रोजी सकाळी ग्रामदैवत आदिशक्ती श्री रेणुका मातेची महापूजा व आरती करून अनेक मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या भाजपाच्या या पदयात्रेला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. रॅलीच्या मार्गावरील विविध मंदिरासह महेबूब सुभानी दर्गा येथे श्रीफळ फोडण्यात आले. जागोजागी उमेदवारांचे मतदारांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. एकूणच भाजपाच्या प्रचार शुभारंभ रॅलीने रेणापूर शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे.
रेणापूर नगरपंचायतीसाठी येत्या ०२ डिसेंबर रोजी मतदान होणार असून या निवडणुकीत भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वाखाली सक्षमपणे निवडणूक रिंगणात उतरलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रीमती शोभा शामराव अकनगिरे सर्व सतरा उमेदवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहाच्या वातावरणात भाजपाचे युवा नेते ऋषिकेशदादा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या पदयात्रेस प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला यात महिलांची संख्या लक्षणीय दिसून येत होती. ढोल ताशाच्या गजरात फटाक्याच्या आतिषबाजीने निघालेल्या या पदयात्रेतील नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शोभा आकनगिरे आणि इतर उमेदवारांचे ठिकठिकाणी मतदारांच्या वतीने स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी महिला भगिनींनी औक्षण करून विजयीभव अशा शुभेच्छा दिल्या.
आदिशक्ती श्री रेणुका माता मंदिरातून निघालेली भाजपाची ही पदयात्रा रेणापूर शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर असलेल्या श्री खंडोबा मंदिर, हनुमान मंदिर, यलम गल्ली, बालाजी मंदिर, हनुमान मंदिर, बौद्ध नगर, खंडोबा मंदिर, एकुरके गल्ली, महेबूब सुभानी मेन रोड या देवदेवतांचे मनोभावे दर्शन घेऊन श्रीफळ फोडण्यात आले. या पदयात्रेत युवा नेते ऋषिकेशदादा कराड यांच्या समवेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शोभा शामराव अकनगिरे, पहिले नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, भाजपाचे नवनाथ भोसले, महिंद्र गोडभरले, अनिल भिसे, सतीश आंबेकर, शरद दरेकर, प्रताप पाटील, उद्धव काळे, सुरज शिंदे, पद्माकर चिंचोलकर, विजय काळे, वसंत करमूडे, श्रीकृष्ण पवार, सुकेश भंडारे यांच्यासह भाजपाचे प्रभागातील उमेदवार सुमन मोटेगावकर, सुनिता बस्तापुरे, धम्मानंद घोडके, दत्ता सरवदे, धरती गाडे, अच्युत कातळे, पल्लवी शिंदे, शेख राबियाबी, शेख हुसेना, आत्तार खैरूनिसा, निलेश उरगुंडे, उत्तम चव्हाण, ज्योती चव्हाण, चतुरा लोकरे, अंजना चव्हाण, प्रदीप राठोड यांच्यासह प्रत्येक प्रभागातील भाजपाचे निरीक्षक, पदाधिकारी, रेणापूर शहरातील कार्यकर्ते मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भाजपाच्या निघालेल्या प्रचार शुभारंभ रॅलीने संपूर्ण रेणापूर शहर ढवळून निघाले आहे.
भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या माध्यमातून झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या विविध विकास कामाच्या आधारावर रेणापुरातील मतदार बंधू भगिनी निश्चितपणे भाजपाला आशिर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत असे सांगून प्रचार शुभारंभ रॅलीच्या समारोप प्रसंगी बोलताना युवा नेते ऋषिकेशदादा कराड म्हणाले की, विजय आपला निश्चित असला तरी प्रत्येक कार्यकर्त्यांनी भाजपाचा प्रचंड मताधिक्याने विजय व्हावा यासाठी जिद्दीने मेहनत घ्यावी असे आवाहन केले. अभिषेक आकनगिरे यांनी पाच वर्षाच्या कार्यकाळात नगरपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या विविध विकास कामाची माहिती सांगून येत्या काळात करावयाच्या कामाचा संकल्प बोलून दाखविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले तर शेवटी दत्ता सरवदे यांनी उपस्थित यांचे आभार मानले.
Tags:
LATUR









