Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

औश्यामध्ये गुटखा विक्री करणार्या टोळीवर धाड; आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

 औश्यामध्ये गुटखा विक्री करणार्या टोळीवर धाड; आठ लाखाचा मुद्देमाल जप्त ;दोन अटक दोन फरार




गुटख्याची अवैध विक्री व्यवसाय करणाऱ्या चार व्यक्ती विरोधात दोन गुन्हे दाखल. 08 लाख 54 हजाराचा मुद्देमाल जप्त.. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची औसा येथे कारवाई.*

            या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री.अमोल तांबे यांनी अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरिता पथकाची निर्मिती करून मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे सुचित केले आहे. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांचे मार्गदर्शनात दि.13/10/2025 रोजी पथकाला मिळालेल्या माहितीवरून औसा पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व पान मसाल्याची अवैध विक्री व्यवसाय करणाऱ्या ठिकाणावर छापेमारी छापेमारी करण्यात आली. सदर छापेमारीत खालील नमूद इसम हे महाराष्ट्र शासनाने विक्री, व्यवसाय, सेवन यासाठी प्रतिबंधित केलेले वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा व पानमसाला बाळगलेले मिळून आले.

1) मारूफ बाबू तांबोळी, वय 25 वर्ष, राहणार समता नगर, औसा.

2) वसीम मेहताब शेख, वय 24 वर्ष, राहणार खडकपुरा गल्ली, औसा.

असे असून त्यांना प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याच्या पुरवठा करणारे 

3) मिनाज बाबू तांबोळी, राहणार समता नगर, औसा.

4) साजिद शेख, राहणार कर्नाटक.

             असे असून नमूद चारही आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे औसा येथे 02 गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून एकूण 08 लाख 54 हजार 495 रुपयाचा गुटखा व पानमसाल्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील आरोपी अनुक्रमांक 01 व 02 यांना अटक करण्यात आली असून अनुक्रमांक 03 व 04 हे फरार असून त्यांना लवकरच नमूद गुन्ह्यात अटक करण्यात येणार आहे.
         सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांच्या नेतृत्वातील पथकामधील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस अमलदार युसुफ शेख, रामहरी भोसले, विशाल गुंडरे, घुगे, चामे यांनी केली आहे.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post