Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीने अतिवृष्टीबाधीतांच्या मदतीसाठी 25 लाखाचा निधी

श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीने अतिवृष्टीबाधीतांच्या मदतीसाठी 25 लाखाचा निधी
मुख्यमंत्री सहाय्यता निधीस जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून धनादेश


लातूर/प्रतिनिधीः- ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यासह लातूर जिल्हयात अतिवृष्टी झालेली होती. या अतिवृष्टीने शेतकर्‍यांसह नागरीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या संकटात शेतकरी आणि नागरीकांना मदतीचा हात अपेक्षीत आहे. त्यामुळे सामाजीक बांधीलकी जोपासत लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने अतिवृष्टीबांधीतांच्या मदतीसाठी 25 लाखाचा निधी देण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सदर निधीचा धनादेश जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकूर यांच्याकडे देवस्थानचे जेष्ठ विश्वस्त तथा माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे व प्रशासक सचिन जांबुतकर यांच्या हस्ते देण्यात आला.
 मराठवाड्यासह लातूर जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झालेली आहे. या अतिवृष्टीने शेती पिकासह शेत जमीनींचे मोठे नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर पुरपरिस्थितीमुळे अनेक नागरीकांच्या घरांची पडझड झाली तर कांही जणांच्या घरात पाणी घुसून संसारउपोगी साहित्याची नासाडी झालेली आहे. या अतिवृष्टीने शेतकरी व नागरीकांचे मोठे नुकसान झालेले असून या परिस्थितीत त्यांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे. लातूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या वतीने सामाजीक बांधीलकी जोपासत अतिवृष्टीबांधीतांसाठी मदीतीचा हात पुढे केलेला आहे. देवस्थानच्या वतीने अतिवृष्टीबांधीतांच्या मदतीकरीता 25 लाख रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आलेल्या या रक्कमेचा धनादेश जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकूर यांच्याकडे देवस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त तथा माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे व देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी देवस्थानचे विश्वस्त अशोक भोसले, सुरेश गोजमगुंडे, बाबासाहेब कोरे, चंद्रकांत परदेशी, व्यंकटेश हालींगे व विशाल झांबरे यांची उपस्थिती होती.
 श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानने नेहमीच सामाजीक बांधीलकी जोपासली असल्याचे सांगत जिल्हाधिकारी वर्षा घुगे-ठाकूर यांनी श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानचे अनुकरण जिल्ह्यातील इतर सामाजिक संस्थानी व देवस्थांनानी करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर सदर मदत निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल देवस्थानचे विश्वस्त व प्रशासक यांचे आभार व्यक्त करुन आगामी काळातही देवस्थान समिती सामाजिक बांधीलकी जोपासत राहिल असा विश्वास व्यक्त केला. 
 श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान हे लातूरचे ग्रामदैवत असून या देवस्थानच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याचे सांगून ज्येष्ठ विश्वस्त तथा माजी नगराध्यक्ष विक्रम गोजमगुंडे यांनी देवस्थानच्या वतीने कायम लोकहिताला प्राधान्य देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. यापुर्वीही देवस्थानच्या वतीने सांगली, कोल्हापूर येथे उद्भवलेल्या पुरपरिस्थितीच्या संकटात तेथील नागरीकांसाठी मदत पाठविले असल्याचे सांगितले. त्याचबरोबर देवस्थानच्या वतीने आरोग्य शिबिर घेऊन नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रयत्नशिल असते असे सांगून आगामी काळातही देवस्थान नेहमीच लोकहिताला प्राधान्य देऊन सामाजिक बांधीलकी जोपासेल अशी ग्वाही दिली.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post