त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारावरील हल्ल्याच्या निषेधार्थ
लातूर मध्ये voice of media च्या (सा विंग) चे जिल्हाध्यक्ष विष्णू आष्टीकर यांनी दिले जिल्हाधिकारि यांना निवेदन
मुख्यमंत्र्यांकडे निवेदने देऊन दोषीवर कडक कारवाईची केली मागणी
लातूर : 22 सप्टेंबर : त्र्यंबकेश्वर नाशिक येथील पत्रकारांना झालेल्या मारहाणीचा व्हाईस ऑफ मीडिया महाराष्ट्र साप्ताहिक विंग च्या वतीने लातूर मध्ये voice of media च्या (सा विंग) चे जिल्हाध्यक्ष विष्णू आष्टीकर यांनी जिल्हाधिकारि यांना निवेदन दिले दोषीवार कडक कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारि मार्फत मुख्यमंत्र्याकडे निवेदनाच्या माध्यमातून (सोमवार 22 सप्टेंबर) रोजी करण्यात आली आहे.
त्र्यंबकेश्वर नाशिक येथे कुंभमेळ्याच्या आयोजना संदर्भात बोलावण्यात आलेल्या बैठकीला वृत्तपत्र, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. यावेळी त्यांची वाहने पार्किंगला लावताना कर पावतीच्या संदर्भात वादावादी निर्माण होऊन पत्रकारांना खाजगी गुंडाकडून मारहाण करण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित झाल्यानंतर राज्यभरातून या घटनेचा निषेध करण्यात आला होता. आणि अशा या गावगुंडावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात येत होती. या घटनेतील अनेक पत्रकार अद्यापही रुग्णालयात उपचार घेत आहेत. याबाबत व्हाईस ऑफ मीडिया महाराष्ट्र साप्ताहिक विंग च्या वतीने 22 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता एकाच दिवशी एकाच वेळी राज्यभरातील प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यातील दोषीवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, राज्यभरामध्ये पत्रकारांच्या वाहनांना टोल आणि वाहन तळकर यातून सूट देण्यात यावी. आणि आगामी काळामध्ये वाहन तळाचे खाजगी कंत्राटदार आणि पत्रकार यांच्यामध्ये वादावादी निर्माण होऊ नये. असे झाल्यास त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा यानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग लातूर जिल्हाध्यक्ष विष्णू आष्टीकर यांच्या वतीने संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, राष्ट्रीय मार्गदर्शक विनोद विनोद बोरे, प्रदेशाध्यक्ष वामन पाठक, अब्दुल कयूम यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. आणि जिल्हाधिकाऱ्यामार्फत निवेदने देण्यात आली. यावेळे दिनेश गिरी,सुनिल कांबळे,आनंद दनके,हरून सय्यद आंदोलनामध्ये राज्यभरामधून मोठा प्रतिसाद मिळाला.
Tags:
LATUR

