Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

रामलिंग मुदगडचा डोंगर भुईसपाट करण्याचे काम नाही थांबविल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करू : शिवानंद मठपती


रामलिंग मुदगडचा डोंगर भुईसपाट करण्याचे काम नाही 
थांबविल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करू : शिवानंद मठपती 


बातमी पाहण्यासाठी QR code scan करा किंवा Share करा


लातूर : निलंगा तालुक्यातील तथा औसा विधानसभा मतदार संघात येणाऱ्या रामलिंग मुदगड येथील सर्व्हे नंबर २१५ मधील डोंगर नियमबाह्यरीत्या भुईसपाट करण्याचे काम चालू आहे. या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते शिवानंद शिवशंकर मठपती यांनी लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. हे काम तात्काळ थांबविले गेले नाही तर आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशाराही त्यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे. 
आज, गुरुवारी शिवानंद मठपती यांनी उपोषणस्थळी पत्रकारांशी संवाद साधला. रामलिंग मुदगड येथील सर्व्हे नंबर २१५ मधील ७ एकर जागेवर उंच डोंगर अस्तित्वातआहे. असे असतानाही त्या जागेत ८० आर खुली जागा असल्याचे खोटे दाखवून ग्रामपंचायतचे सरपंच - उपसरपंच,तलाठी, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, निलंगा उपविभागीय अधिकारी - तहसीलदारांनी यांनी प्रशासनाची व जिल्हाधिकाऱ्यांची फसवणुक करण्याचे काम केले आहे. पर्यावरणाचा जाणीवपूर्वक ऱ्हास करून सदरील जागा मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेअंतर्गत ३३ केव्ही उपकेंद्रासाठी देण्यात आली आहे. मात्र या गायरान जमिनीवरील डोंगर पोखरून गौण खनिज उत्खनन करण्यात आले आहे. या जमिनींवरील गौण खनिजाची नियमबाह्य विक्रीही केली जात आहे. सादर जमिनीवरील नियमबाह्य काम तात्काळ बंद करून दोषींवर कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी शिवानंद मठपती उपोषण करत आहेत.
हे काम औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असल्याचा आरोपही मठपती यांनी यावेळी केला. आपल्या उपोषणाची दोन दिवसात दखल नाही घेतल्यास लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. पत्रकार आनंद दणके, पत्रकार श्रीकांत चलवाड हेही या उपोषणात सहभागी आहेत. 
--------------------------------

रामलिंग मुदगडचा डोंगर भुईसपाट करण्याचे काम नाही 
थांबविल्यास जिल्ह्यतील पत्रकार या लढ्यामध्ये उतरतील 


हे काम औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असल्याचा आरोपही मठपती यांनी यावेळी केला. आपल्या उपोषणाची दोन दिवसात दखल नाही घेतल्यास लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे .अश्या या गंभीर प्रकरणात आता VOICE OF MEDIA ही उतरली असून या उपोषणास VOICE OF MEDIA(सा.विंग)चे जिल्हाअध्यक्ष विष्णू आष्टीकर यांनी पाठिंबा दिला असून लवकरात लवकर निर्णय नाहि घेतल्यास जिल्ह्यातील सर्व पत्रकार या लढ्यामध्ये उतरतील असा ईशारा दिला आहे

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post