रासलीला दांडियाचे उत्पन्न मुख्यमंत्री सहायता निधीत जमा.....
तोष्णीवाल बंधूंची सामाजिक बांधिलकी
१,११,०००/- रुपयांचा धनादेश डॉ अर्चनाताई चाकूरकर यांच्याकडे सुपुर्द
मराठवाड्यातील मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यात आणि मराठवाड्यात झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने शेती खरडून गेली, जमिनी वाहून गेल्या, पशुधनाचेही नुकसान झाले. शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोसळला. या पार्श्वभूमीवर लातूर येथील शिवप्रसाद तोष्णीवाल आणि जुगलकिशोर तोष्णीवाल यांच्या वतीने २५ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित रासलीला या दांडिया नाईट कार्यक्रमातून मिळालेले उत्पन्न मुख्यमंत्री सहायता निधीस देत आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली. याबाबत डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी तोष्णीवाल बंधूंना आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत १ लाख ११ हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी डॉ अर्चनाताई यांच्याकडे आज सुपूर्द करण्यात आला.