आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडून व्यंकटेश पूरी परिवाराचे केले सांत्वन
लातूर, दि.09/08/2025
येथील सामाजिक कार्यकर्ते व्यंकटेश पुरी यांचे वडील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक श्री विश्वभर संभ बुवा पुरी गुरूजी यांचे नुकतेच निधन झाले. गुरुजींच्या निधनानंतर अनेकांनी दुःख व्यक्त केली आहे.
आज शनिवारी औसा विधानसभा मतदानसंघाचे आमदार अभिमान्यु पवार यांनी आसोपा गल्ली येथील त्यांचे घरी जाऊन विश्वभर पुरी यांच्या प्रतिमेसमोर अभिवादन करून पुरी परिवाराचे सांत्वन केले. यावेळी शिलाताई विश्वंभर पुरी ,व्यंकटेश पुरी ,वैभव, त्यांच्या भगीणी,जावाई,सुना आदींना भेटुन ईश्वर पुरी परिवाराला या दु:खतून सावरण्याची शक्ती देवो, अशा भावना व्यक्त करत विश्वंभर गुरुजींच्या आत्म्यास चिरंशांती लाभो अशा भावना व्यक्त केल्या. त्यांच्या यावेळी त्यांचा सोबत लातूर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष देवीदास काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Tags:
LATUR