Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

बनावट वैयक्तिक मान्यता घेणार्‍या कर्मचार्‍यांचे वेतन थांबवावे

बनावट वैयक्तिक मान्यता घेणार्‍या कर्मचार्‍यांचे वेतन थांबवावे

व्ही.एस. पँथर्सचे मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन


लातूर, दि.१४- बनावट वैयक्तिक मान्यता देवून शालार्थ आयडी दिलेल्या अपात्र कर्मचार्‍यांचे वेतन थांबवून संबंधित संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षणाधिकारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
व्ही. एस. पँथर्सचे जिल्हाध्यक्ष शरद किणीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हणले आहे की, २०१२ साली झालेल्या शासन निर्णयानुसार राज्यात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना वैयक्तिक मान्यता देण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे. असे असताना श्री. महात्मा बसवेश्‍वर शिक्षण संस्थाद्वारा संचलित महात्मा बसवेश्‍वर कनिष्ठ महाविद्यालय, देशिकेंद्र विद्यालय, नीळकंठेश्‍वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व शंभुलिंग शिवाचार्य विद्यालयात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना बनावट कागदपत्राद्वारे व शासनाच्या अटी व नियत्रांची पूर्तता न करता वैयक्तिक मान्यता घेण्यात आलेली आहे.
विभागीय उपसंचालक कार्यालय, शिक्षणाधिकारी (माध्य.)जिल्हा परिषद व शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांच्याकडून शासनाच्या निर्णयाची पायमल्ली करून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना वैयक्तिक मान्यता देवून शालार्थ आयडी देण्यात आली. त्यामूळे शासनाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली असून गुणवत्ताधारक व पवित्र पोर्टल मार्फत होणार्‍या नियुक्त्यावर अन्याय झालेला आहे.
वैयक्तिक मान्यता घेतलेल्या अपात्र कर्मचार्‍यांचे वेतन तत्काळ थांबवून संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी किनीकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून या निवेदनाच्या प्रती शिक्षणमंत्री, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त पुणे, आणि शिक्षण संचालक, पुणे यांना देण्यात आलेल्या आहेत.

Post a Comment

You have in a dout late me know

Previous Post Next Post