माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्याकडून
विलास बँकेचे संचालक व्यंकटेश पुरी यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन
लातूर प्रतिनिधी: शुक्रवार दि. १५ ऑगस्ट २०२५
विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक व्यंकटेश पुरी यांचे वडील आदर्श शिक्षक
विश्वंभर पुरी यांचे नुकतेच निधन झाले. राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व
सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा
महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव
देशमुख यांनी शुक्रवार, १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी लातूर शहरातील अग्रसेन
भवन, झिंगणआप्पा गल्ली परिसरातील विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक
व्यंकटेश पुरी यांच्या निवासस्थानी भेट देऊन पुरी कुटुंबीयांचे सांत्वन
केले आणि त्यांना धीर दिला.
यावेळी वैभव पुरी, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव,
विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, महेश काळे, विष्णुदास
धायगुडे, बिडवे अप्पा, महेश कोळे, अभिषेक पतंगे, अभिजीत इगे आदींसह पुरी
कुटुंबीय आणि मित्र परिवार उपस्थित होते.
Tags:
LATUR