व्यंकटेश पुरी यांना पितृशोक; भातांगळी येथे अंत्यविधी
लातूर :-लातूर येथील आझाद चौक परिसरातील आसोपा गल्ली भागातील आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त बाल वाङमय साहित्य राज्य पुरस्कार प्राप्त श्री विश्वंभर संभा बुवा पुरी गुरुजी म्हणुन प्रचलीत असलेले विश्वंभर सांभबुवा पुरी यांचेबुधवार दि.६आॅगष्ट २०२५दुपारी ५=००वाजता खाजगी रुग्नालयात वृध्दपकालीन अल्पशा आजाराने वयाच्या ८2 व्या वर्षी देवाज्ञा झाली.
त्यांच्या पच्छात पत्नी २ मुले२ मुली सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे
विश्वंभर पुरी यांच्या पार्थीवावर गुरुवार, दि. ७/८/२०२५रोजी भातांगळी येथे त्यांच्या पार्थीवावर सकाळी १० वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे निकट वर्तीयांनी कळवल आहे. ते लातूर शहर कॉंग्रेस मीडिया सेल अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते
व्यंकटेश पुरी, वैभव पुरी यांचे वडील होते
बस्वेश्वर गणेश मंडळ,शेटे गल्ली ,व अप्पा गणेश मंडळ,चौदाघर मठ तसेच भारत रत्नदिप आझाद गणेश मंडळ ,आझाद चौक लातुर यांच्यावतीने भावपुर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.