Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

युगंधर हौसिंग सोसायटीचा ग्रीन बेल्ट बळकावणाऱ्या सचिव - अध्यक्षांवर कठोर कार्यवाही व्हावी : प्रा.डॉ. शहेजादी शेख

युगंधर हौसिंग सोसायटीचा ग्रीन बेल्ट बळकावणाऱ्या सचिव - अध्यक्षांवर कठोर कार्यवाही व्हावी : प्रा.डॉ. शहेजादी शेख













लातूर : लातूर शहराच्या अंबाजोगाई रोड वरील आर्वी परिसरातील युगंधर हौसिंग सोसायटीचा साडेअकरा हजार फूटांपेक्षा अधिक असलेला ग्रीन बळकावून तो बेकायदेशिररित्या आर्वी ग्रामपंचायतच्या घशात घालण्याचा प्रयत्न करणारे सोसायटीचे अध्यक्ष डॉ. जालिंदर केकाण व बनावट सचिव अशोक बारीकराव पवार यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी या सोसायटीच्या सभासद तथा संविधान सेवा संघ महाराष्ट्रच्या संस्थापक अध्यक्षा प्रा. डॉ. शहेजादी शेख यांनी गुरुवारी लातुरात पत्रकार परिषदेत बोलताना केली. 
       लातूरच्या आर्वी परिसरात साधारणतः अडीच एकर जागेवर युगंधर हौसिंग सोसायटीची उभारणी करण्यात आली असून या सोसायटीत केवळ २४ सभासद आहेत. सोसायटीच्या मालकीचा किमान ११ हजार ८०० स्क्वेअर फुटांचा एक मोठा ग्रीन बेल्ट सोडण्यात आलेला आहे. कोणत्याही हौसिंग सोसायटीचा ग्रीन बेल्ट हा त्या सोसायटीच्या सभासदांच्या मालकीचा असतो. ग्रीन बेल्ट मुलांसाठी खेळाचे मैदान म्हणून तसेच मोकळी जागा म्हणून उपयोगात आणला जाणे आवश्यक असते. असे असताना स्वतःला युगंधर हौसिंग सोसायटीचा सचिव म्हणवून घेणारे अशोक पवार हे सोसायटीचे सभासदही नसताना त्यांनी हा ग्रीन बेल्ट आर्वी ग्रामपंचायतच्या घशात घालण्याचा कुटील डाव रचला असल्याचे सांगून प्रा.डॉ. शहेजादी शेख यांनी सदर ग्रीन बेल्टवर बेकायदा राम मंदिराची उभारणीही करण्यात आल्याचे नमूद केले. राम मंदिराला आपला विरोध नाही. आपण सर्वधर्म समभाव मानून चालण्याचे काम करतो. सोसायटीच्या स्वयंघोषित सचिवांनी व अध्यक्षांनी या जागेवर राम मंदिराच्या आडून आर्वी ग्रामपंचायतला अंगणवाडीचे बांधकाम करण्यास प्रवृत्त केले. याचाच अर्थ सचिवांनी बेकायदेशीरपणे सोसायटीच्या मालकीचा असलेला हा ग्रीन बेल्ट आर्वी ग्रामपंचायतच्या नावे करून दिला. आर्वी ग्रामपंचायतला त्या जागेचा आठ अ चा उताराही दिला गेला आहे. त्यामुळे आर्वी ग्रामपंचायतच्या हद्दीतील अनेक ग्रीन बेल्ट्स, पाणंद रस्ते, शेतरस्ते, खुल्या जागा अवैधरित्या बळकावण्यात आल्या आहेत , याचाही शोध घेणे आता आवश्यक बनल्याचे प्रा. डॉ. शेख यांनी सांगितले. 
                         आपल्या सोसायटीची संरक्षक भिंत आर्वी ग्रामपंचायतने बेकायदेशीरपणे पाडून ग्रीन बेल्टवर अतिक्रमण केले. पाडण्यात आलेल्या संरक्षक भिंतीचे बांधकाम करत असताना सोसायटीच्या सचिवांनी या कायदेशीर बाबीला सोसायटीबाहेरचा बेकायदेशीर जमाव, ग्राम पंचायतचे सरपंच पप्पू उर्फ धनंजय देशमुख, माजी सरपंच विलास भोसले, उप सरपंच सचिन सूर्यवंशी, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे एपीआय सानप व त्यांच्या पोलीस पथकासह विऱोध दर्शवून बांधलेली संरक्षक भिंत पुन्हा एकदा पाडली. त्यावेळी एपीआय सानप यांनी तेथे उपस्थित जमावाला चिथावणी देऊन आपल्यावर जमावाकडून हल्ला ( मॉब लिंचिंग ) करण्यास प्रवृत्त केल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जमावाने आपल्या गाडीवर दगडफेक करून गाडीचे नुकसान केले. गाडीवर हल्ला होताच आपण स्वसंरक्षणार्थ तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राधिका पाटील नावाची महिला गाडी अडवण्याचा उद्देशाने गाडीसमोर येऊन उभी राहिली. आपण त्या महिलेच्या बाजूने गाडी काढून तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केला, त्याला काही मंडळींनी आपण त्या महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचा बनाव केला व आपल्याविरुद्ध खोटा गुन्हा नोंद केला. या प्रकरणी आपण पोलिसांना वास्तव कथन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याची दखल व तक्रार घेतली नाही. हे संपूर्ण प्रकरण केवळ सोसायटीचा ग्रीन बेल्ट बळकावण्याचा प्रयत्न असल्याने आपण सामाजिक बाब म्हणून हा लढा देत आहोत. मात्र, त्याला काही मंडळींकडून धार्मिकतेचा रंग देण्याचा अयशवी प्रयत्न केला गेल्याचे प्रा. डॉ. शेख यांनी सांगितले. या हौसिंग सोसायटीची नोंदणी १९९९ ला झाली. तेव्हापासून २०२३ पर्यंत सोसायटीचे सर्व सभासद एक परिवार या नात्याने गुण्यागोविंदाने राहत होते. परंतु सचिव अशोक पवार व अध्यक्ष डॉ. केकाण हे दोघे मूलतः बीडचे. ते सोसायटीत जेव्हा राहायला आले तेव्हापासून सोसायटीत वादाला सुरुवात झाल्याचेही प्रा. डॉ. शहेजादी शेख यांनी सांगितले. 
यावेळी संविधान सेवा संघाचे उपाध्यक्ष अॅड. गोविंद सिरसाठ यांनी या प्रकरणाची कायदेशीर बाजू विस्तृतपणे विशद केली. 
------------------------------------



Previous Post Next Post